Eknath Shinde : राऊतसाहेब आमचे नेते, आमदारांना मारहाणीच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच थेट उत्तर
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, तसेच त्यांना आपहरण करून गुजरातला नेण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी करताच आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांवर दबाव टाकण्यात आला तसेच त्यांचे आपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यातील काही जणांना मारहाण देखील करण्यात आली, असा आरोप केला होता. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावत असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, असा कोणताही प्रकार लोकशाहीत होऊ शकत नाही. आरोप प्रत्यारोप हा रणनितीचा एक भाग आहे. आम्ही जर आमदारांना गुजरातमध्ये नेले तर ते बळजबरीने आसाममध्ये आले का असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हटलं एकनाथ शिंदे यांनी?
आमदारांचे आपहरण करून त्यांना गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. लोकशाहीमध्ये असा प्रकार होऊ शकत नाही. आम्ही कोणालाही बळजबरी केलेली नाही. संजय राऊत हे आमचे नेते आहेत. तो एक रणनितीचा भाग आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकला नाही. आम्ही जर त्यांना दबाव टाकून गुजरातला नेले असते, मग ते आसामला कसे काय आले? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
दुसऱ्या पक्षात जाण्यााच अद्याप विचार नाही
दरम्यान पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा अद्याप विचार केलेला नाही. आम्ही कोणीच दुसऱ्या पक्षात जाणार नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार मला पुढे घेऊन जायचे आहेत. त्यामुळे हिंदुत्त्वाशी फारकत घेणार नाही. कोणावरही टीका करून मला वेळ वाया घालवायचा नाही. आम्हाला एकूण 40 आमदारांचा पाठिंबा असून, हीच खरी शिवसेना आहे.