शासकीय वसुली थांबवण्यासाठी पंढरपुरात वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे : प्रकाश आंबेडकर
विधानसभेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मोटे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. | Prakash Ambedkar

पंढरपूर (सोलापूर): कोळी समाजाच्या लोकांकडे व्हॅलेडीटी सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सर्टिफिकेट नसताना नोकरी मिळविली म्हणून सरकारची फसवणूक केली आहे असे गृहीत धरून शासनाने अश्या लोकांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. ही वसुली थांबवायची असेल तर विधानसभेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीत (Pandharpur By Poll) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) उमेदवार बिरप्पा मोटे (Birappa Mote) यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. (Elect the VBA candidate in the Pandharpur by-election Prakash Ambedkar)
कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळावे म्हणून वंचित बहुजन आघाडीने आंदोलन उभे केले होते. परंतु त्यांना व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळाले नाही. म्हणून अनेकांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. शिवाय सर्टिफिकेट न देणाऱ्या लोकांवर शासनाची फसवणूक केली आहे म्हणून कारवाईला सुरुवात झाली आहे. नोकरी काळात शासनाने अशा लोकांवर कोट्यावधी रुपये खर्च केले असून त्याची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
वंचितच्या उमेदवाराला निवडून द्या
ते पुढे म्हणाले की अशा प्रकारची वसुली महादेव कोळी समाजाला परवडणारी नसून त्यांनी हे का सहन करावे, ही वसुली थांबवायची असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की त्यांनी वसुली करू नये अशी भूमिका घेतली. उद्याची वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाला आपण आवाहन करतो की त्यांनी पंढरपूर मध्ये होणाऱ्या पोट निवडणुकीत वंचितचे उमेदवार बिरप्पा मोटे यांना विजयी करावे. असे झाले तर भविष्यातील ही वसुली थांबविण्यात येणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
पंढरपुरात भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे थेट लढत
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जातेय.
(Elect the VBA candidate in the Pandharpur by-election Prakash Ambedkar)
मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी, लोकल पुन्हा बंद होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवारांचं सूचक विधानhttps://t.co/FYrkcshMXi#MumbaiLocal #Lockdown #CoronaVirus #VijayWadettiwar
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 8, 2021
हे ही वाचा :
VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”