मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा (Election 2022) असे आदेश अलिकडेच राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगा आता एक्शन मोडममध्ये आला आहे. कारण निवडणूक आयोगाने आज अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश हे राज्यातील बड्या महापालिकांना (Municipal Corporation Election) दिले आहेत. 17 मेपर्यंत अंतिम प्रभागरचना निश्चित करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने आज काढले आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकाना पत्राद्वारे हे कळवण्यात आले आहे. सोमवारीच निवडणुक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यामुळे आता या सर्व महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या आदेशानंतर या महापालिकाही कामाला लागल्या आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली या सर्व राज्यातील बड्या महानगरपोलिका असल्याने सर्वच राजकीय पक्ष जोमाने आधीपासूनच निवडणुकांची तयारी करत आहेत. मुंबईतल्या लढतीकडे तर देशाचे लक्ष लागले असते. कारण सर्वांत जास्त महसूल देणारी महानगरपालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं.
या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र पाटलटलं आहे.