नारायण राणेंना उत्तर देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मैदानात

सिंदुधुर्ग : लोकसभेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंचा मुलागा निलेश राणेंचा पराभव झाला. मात्र या निकालानंतर नारायण राणे यांनी निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या आरोपांना आता स्वत: निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. लोकसभेच्या निकालात ईव्हीएमपासून ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही लोकप्रतिनिधींसोबत करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली. […]

नारायण राणेंना उत्तर देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मैदानात
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 10:53 AM

सिंदुधुर्ग : लोकसभेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंचा मुलागा निलेश राणेंचा पराभव झाला. मात्र या निकालानंतर नारायण राणे यांनी निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या आरोपांना आता स्वत: निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.

लोकसभेच्या निकालात ईव्हीएमपासून ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही लोकप्रतिनिधींसोबत करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली. हेराफेरीचा आरोप पूर्ण खोटा आहे, असं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत अशी लढत झाली. यामध्ये विनायक राऊत यांनी बाजी मारली. मात्र नारायण राणे यांनी हा पराभव मान्य नसल्याचं म्हणत, निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला.

“हा जो निकाल आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही. आपण पराभूत झालो असलो तरी हा पराभव आपल्याला मान्य नाही. या निवडणुकीत आपला पक्ष कुठेच कमी पडला नाही. चांगल्या प्रकारचा प्रचार झाला. वातावरण आपल्या बाजूने होतं. या उलट शिवसेना कमकुवत होती. कुठेही शिवसेनेच्या बाजूने मतदारसंघात वातावरण नव्हतं. शिवसेनेचे मतदान केंद्राबाहेर बूथही दिसत नव्हते. असं असताना शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं हे संशयास्पद आहे”, असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

राणेंच्या आरोपांना निवडणूक आयोगानेच उत्तर देत, सर्व आरोप फेटाळले आहेत.

एनडीएचे दोन घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा लढत झाली. या लोकसभा निवडणुकीत बालेकिल्यात शिवसेनेची, तर नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत 1 लाख 78 हजारांपेक्षा जास्त मतांनी विद्यमान खासदार विनायक राऊत निवडून आले. माजी खासदार निलेश राणे यांचा पुन्हा एकदा पराभव करत विनायक राऊत यांनी बाजी मारली.

संबंधित बातमी 

कुठेही शिवसेनेच्या बाजूने वातावरण नव्हतं, मुलाचा पराभव मान्य नाही : राणे 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.