मुंबई : एकावेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक (Election candidates) लढवणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक (Election Commission) लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्याला दुसर्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. तसंच एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. त्या संबंधी मागमी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे (Centre government) पाठवलाय. निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे बदल केले जावेत या दृष्टीनं मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पावलं टाकली आहे. निवडणूक आयोगाने पाठलेला हा प्रस्ताव जर मान्य झाला, तर 1951च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होणार आहे.
अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचं अनेकदा पाहण्यात आलेलं आहे. याला मुख्य निवडणूक आयोगानं विरोध केल्याचं प्रस्तावातून दिसतंय. तसंच एक्झिट पोल्सची चर्चा निवडणूक निकालाची आधी तुफान असायची. या एक्झिट पोल्सवरही बंद येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
एकूण 6 प्रमुख मागण्या मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केलेले असून केंद्र सरकार या प्रस्तावावर नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचंय.