चिंचवडमध्ये चाललंय काय? भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी ‘पेड न्यूज’ दिली?

निवडणूक आयोगाची समिती एमसीएमसीकडे यासंबंधीचा खुलासा पाठवण्यात आला आहे. आता ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे.

चिंचवडमध्ये चाललंय काय? भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी 'पेड न्यूज' दिली?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 8:44 AM

रणजित जाधव,  पुणे : कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांचा (By Election) रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. भाजपसाठी ही निवडणूक जास्तच आव्हानात्मक ठरणार हे निश्चित आहे. निवडणुकीपूर्वीची सर्वेक्षणं भाजपने गांभीर्याने घेतली आहेत. त्यामुळेच अत्यंत काटेकोरपणे रणनीती आखली जात आहे. एवढं असूनही चिंचवडमधील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस धाडली आहे. जगताप यांच्याकडून आयोगाने लेखी उत्तर मागवले आहे. अश्विनी जगताप यांनी खुलासाही पाठवला आहे. आता या उत्तराची पडताळणी आयोगाच्या विशेष समितीकडून सुरु आहे.

काय घडलं नेमकं?

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. विजयाचा गुलाल आपणच उधळणार, या आत्मविश्वासाने मविआ तसेच भाजप-शिंदे गट कामाला लागले आहेत. मात्र प्रचारांतील प्रत्येक घडामोडीवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे. चिंचवड मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आल्या. त्यापैकी 10 तक्रारीवरून गांभीर्याने कारवाई करण्यात आली आहे. मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे 43 लाख रुपयांची रोकड, चार लाख 97 हजार 625 रुपये किंमतीचे मद्य आणि 94 हजार 750 रुपयांचा 3  किलो 584 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे.

भाजप उमेदवार अस्विनी जगपात यांच्याबद्दलची एक बातमी न्यूज पोर्टल आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हा एकूणच मजकूर पेड न्यूज सारखा असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आले होते. यावरून सदर समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचं पत्र पाठवलं होतं. त्यानुसार,पोट निवडणुकी संबंधित निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी १६ फेब्रुवारी रोजी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस पाठवली आहे. अश्विनी जगताप यांचे लेखी म्हणणेही आयोगाने मागवले. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे.

खुलासा पाठवला, पुढे काय?

एमसीएमसी समितीला यासंबंधीचा खुलासा पाठवण्यात आला आहे. आता ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित केली जाईल. त्यामुळे आयोगातर्फे काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.