Puducherry Election 2021 | पुद्दुचेरीत काय होणार? काँग्रेस पुन्हा येणार की जाणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

गेल्या 22 फेब्रुवारीला काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले (Puducherry Election 2021).

Puducherry Election 2021 | पुद्दुचेरीत काय होणार? काँग्रेस पुन्हा येणार की जाणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
Congress
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:53 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम याच चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या (Puducherry Election 2021) म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज अखेर वाजलं. राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका होणार आहेत. आमदारांनी बंड केल्याने सत्ता सोडावी लागलेल्या काँग्रेसला मतदार पुन्हा सत्तेत येण्याची संधी देणार की पुन्हा राज्यात खिचडी सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल. पुद्दुचेरीच्या राजकारणावर टाकलेला हा प्रकाश. (Puducherry Election 2021)

पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान

पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.

निवडणुकीपूर्वी पुद्दुचेरीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

गेल्या 40 वर्षात असं पहिल्यांदाच झालंय जेव्हा दक्षिण भारतातील एकाही राज्यात काँग्रेसची सत्ता नाही. गेल्या 22 फेब्रुवारीला काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले. आमदारांनी साथ सोडल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची ही अवस्था दयनीय आहे. काँग्रेसवर अशी वेळ आणीबाणीनंतरही आलेली नव्हती, जी आता आहे. उलट तेव्हा दक्षिण भारतानेच काँग्रेसला आधार दिला होता. सध्या काँग्रेसची फक्त पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता कायम आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 10 झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले.

इंदिरा गांधीच्याही राजकीय प्रवासाला दक्षिण भारतातून सुरुवात

उत्तर भारतातील पारंपारिक जागेला बाजुला सारत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात दक्षिण भारतातून (चिकमंगळूर-कर्नाटक, 1978) केली होती. त्याशिवाय, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील त्यांच्या जारकीय जीवनाची सुरुवात दक्षिण भारतापासून (बेल्लारी-कर्नाटक, 1998) केली होती. तसेच, काँग्रेसचे भविष्य म्हटल्या जाणाऱ्या राहुल गांधीही उत्तर भारताला सोडून दक्षिण भारताला निवडलं. त्यांनी 2019 मध्ये केरळ येथील वायनाड मतदार संघातून निवडणूक लढली आणि जिंकलेही.

पुद्दुचेरीमध्ये आता काय होणार?

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 15 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एआयएडीएमकेला 4, एआयएनआरसीला 8, डीएमकेला 2 आणि इतरला 1 जागा मिळाली होती. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत. पुद्दुचेरीत आता 30 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक घेतली जाईल.

पुद्दुचेरीचं राजकीय गणित काय?

पुद्दुचेरी हे एक केंद्र शासित राज्य आहे. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस 21 जागांवर लढली होती आणि 15 जागा जिंकल्याही होत्या. ऑल इंडिया एनआर काँग्रेसने 30 जागांवर निवडणूक लढून फक्त 8जागा जिंकल्या होत्या. इते बहुमतासाठी 16 जागा पाहिजे.

सध्या पुद्दुचेरी विधानसभेत कोणत्या पक्षाचे किती आमदार?

पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे 10, DMK 3, ऑल इंडिया एन आर काँग्रेस 7, AIDMK 4, भाजप 3 तर 1 अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अयोग्य ठरले आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक

या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला आहे. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत.

किरण बेदी यांची उचलबांगडी

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या किरण बेदी यांची पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. किरण बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. 10 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राद्वारे उपराज्यपालांना परत बोलवण्याची विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप व्ही. नारायणसामी यांनी केला होता.

पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे याता या निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काही तासांत त्यावरील सस्पेन्स दूर होणार आहे. या पाचही राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणचे उमेदवारही नक्की करण्यात आले आहेत. फक्त निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करताच राजकीय पक्षांकडून उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत (Puducherry Election 2021).

कुठल्या राज्यात किती जागा

पश्चिम बंगाल : 294

तामिळनाडू : 234

पुद्दुचेरी : 30

आसाम : 126

केरळ : 140

कार्यकाळ कधी संपणार?

पश्चिम बंगाल : 30 मे 2021

आसाम : 31 मे 2021

तामिळनाडू : 24 मे 2021

केंद्र शासित पुद्दुचेरी : 6 जून 2021 (सध्या राष्ट्रपती राजवट)

केरळ : 1 जून 2021

निवडणूक आयोगाच्या विशेष गाईडलाईन्स

वाढत्या कोरोनाच्या संसर्गात या पाचही राज्यात निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विशेष गाईडलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारांनी या गाईडलाइनची काटेकोरपालन करावे म्हणून मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्तही ठेवला जाण्याची शक्यता आहे.

250 कंपन्या तैनात करणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने या पाचही विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलाच्या एकूण 250 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 75 कंपन्या तैनात ठेवण्यात येणार आहेत.

Puducherry Election 2021

संबंधित बातम्या :

पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं ‘तांडव’; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!

मोठी बातमी: पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी

Puducherry Floor Test: काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा राजीनामा; पुदुचेरीत सरकारची अग्निपरीक्षा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.