Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : अखेर काँग्रेसला अध्यक्ष मिळणार, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान नव्या अध्यक्षांची होणार निवड

Congress : राहुल गांधी यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही? असा सवाल या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, येत्या काही दिवसातच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार की नाही याचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

Congress : अखेर काँग्रेसला अध्यक्ष मिळणार, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान नव्या अध्यक्षांची होणार निवड
अखेर काँग्रेसला अध्यक्ष मिळणार, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान नव्या अध्यक्षांची होणार निवडImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:40 AM

नवी दिल्ली: अखेर काँग्रेसला (congress) नवा अध्यक्ष मिळणार आहे. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षापासूनचा अध्यक्षपदाचा काँग्रेसचा शोधही थांबणार आहे. येत्या 21 ऑगस्टपासून नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवल्यास गांधी घराण्याबाहेरची (gandhi family) व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राहुल गांधी (rahul gandhi) हे निवडणूक लढवणार की नाही हे सुद्धा येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांनाही ही निवडणूक लढण्याची गळ घालण्याची शक्यता नकारता येत नसल्याचंही सांगितलं जात आहे.

येत्या 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळू शकतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नामांकनाची तारीख ठरवण्यासाठी लवकरच काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावली जाणार आहे. काँग्रेसने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

पदयात्रे आधीच अध्यक्ष मिळणार

काँग्रेसची 3500 किमीची पदयात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये राहुल गांधी सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या पदयात्रेपूर्वी पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्य

राहुल गांधींना अध्यक्ष करा

सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मधल्या काळात राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. मात्र, अनेक निवडणुकात पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्तच होतं. नंतर सोनिया गांधी यांननी पक्षाचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. मात्र, पक्षातील काही नेत्यांना हे पटलेलं नाही. त्यांच्याकडून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. काही नेत्यांनी तर राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच भाजपला टक्कर दिली जाऊ शकते, असा दावा या नेत्यांनी केला आहे.

पक्षाचे कार्यकर्तेही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत. त्यामुळे विचारधारेच्या पातळीवर काँग्रेसशी लढा दिला जाऊ शकतो. मात्र, राहुल गांधी यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही? असा सवाल या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, येत्या काही दिवसातच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार की नाही याचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.