NMC Election 2022 Ward 31 : भाजप पुन्हा एकहाती सत्ता मिळवणार कि काँग्रेस चमत्कार करणार? जाणून घ्या प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती

मागील निवडणुकीत या प्रभागामधून चारही भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला कुठला पक्ष तागडे आव्हान देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

NMC Election 2022 Ward 31 : भाजप पुन्हा एकहाती सत्ता मिळवणार कि काँग्रेस चमत्कार करणार? जाणून घ्या प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती
नागपूर महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:05 AM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने चांगलाच वेग घेतला आहे. सध्या राज्यातील सत्तांतरामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वजनदार नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपूरमध्येही महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. नागपूर महापालिका (Nagpur Municipal Corporation) हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप (BJP)ने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. 151 पैकी तब्बल 108 जागांवर विजयी होऊन भाजपने महापालिकेची एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळवले होते. तीच कमाल यंदाच्या निवडणुकीत दाखवून भाजप या महापालिकेतील कमळ फ़ुललेलेच ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या विजयाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रभाग क्रमांक 31 चे महत्वपूर्ण योगदान असणार आहे. मागील निवडणुकीत या प्रभागामधून चारही भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला कुठला पक्ष तागडे आव्हान देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 46363 अनुसूचित जाती – 2998 अनुसुचित जमाती – 1885

सध्याचे आरक्षण कसे आहे?

31 अ – सर्वसाधारण महिला 31 ब – सर्वसाधारण महिला 31 क – सर्वसाधारण

हे सुद्धा वाचा

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार

अ वॉर्ड – उषा पालट (भाजप) ब वॉर्ड – सतीश होले (भाजप) क वॉर्ड – शीतल कामडे (भाजप) ड वॉर्ड – रवींद्र भोयर (भाजप)

प्रभाग क्रमांक 31 ची व्याप्ती कोठून कुठपर्यंत?

प्रभाग क्रमांक 31 मध्ये जुनी शुक्रवारी, महावीरनगर, गणेशनगर, शिवनगर, आनंदनगर, स्वीपर कॉलनी, भगत कॉलनी, ओमनगर, सुदामपुरी, बापू नगर, ओम मेरे लेआउट, गुरुदेवनगर, नवीन नंदवन या प्रमुख विभागांचा समावेश होतो. नागपूर महापालिकेची यंदाची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

काँग्रेस आव्हान देणार का? राजकीय वर्तुळाचे लक्ष

भाजपने नागपूर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र याचवेळी काँग्रेस सक्रिय होऊन भाजपला तगडे आव्हान देतो का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून तयारी केली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. यंदाची महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. 2002 ची निवडणूकसुद्धा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. त्यामुळे काँग्रेसकडून कशाप्रकारे व्यूहरचना रचली जाऊन 2002 च्या विजयाची पुनरावृत्ती केली जातेय, हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.