Nasik NMC Election 2022 Ward 26 : भाजपच्या सत्तेच्या आसनाला शिवसेना सुरुंग लावणार? जाणून घ्या राजकीय समीकरणे

महापालिकेच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चालूवर्षी दोन लाख मतदारांची वाढ झाली आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या महापालिकेवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. ही सत्ता अबाधीत राखण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

Nasik NMC Election 2022 Ward 26 : भाजपच्या सत्तेच्या आसनाला शिवसेना सुरुंग लावणार? जाणून घ्या राजकीय समीकरणे
नाशिक महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:00 AM

नाशिक : राज्यातील प्रमुख महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. प्रमुख शहरांत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नाशिक महापालिके (Nashik Municipal Corporation)साठीही सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. येथील निवडणूकही राजकीय पक्षां (Political Party)चे भवितव्य ठरवणार आहे. नाशिक महापालिकेची यंदा सातवी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक (General Election) होत आहे. नाशिक महापालिकेची प्रभाग रचना अलीकडेच जाहीर झाली असून त्यानुसार यंदा या महापालिकेचे 44 प्रभाग राहणार आहेत. याआधीच्या म्हणजेच 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत येथील प्रभागांची संख्या 31 होती. महापालिकेच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चालूवर्षी दोन लाख मतदारांची वाढ झाली आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या महापालिकेवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. ही सत्ता अबाधीत राखण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. त्याचवेळी गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेल्या शिवसेनेनेही कडवी झुंज देत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे.

नाशिक महापालिका निवडणूक वॉर्ड 26 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 26 ची लोकसंख्या

प्रभाग क्रमांक 26 हा शिखरेवाडी परिसर, कॅनाल रोड झोपडपट्टी या नावाने ओळखला जातो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 31974 इतकी आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या 10598 एवढी असून तुलनेत अनुसुचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या कमी आहे. या प्रवर्गात 831 इतकी लोकसंख्या सरकारी कागदोपत्री नोंद आहे.

प्रभागामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो?

प्रभाग क्रमांक 26 ची व्याप्ती मोठी आहे. या प्रभागात साने गुरुजी नगर, भीमनगर, शिखरेवाडी ग्राउंड, नेहरू नगर वसाहत, इंदिरा गांधी झोपडपट्टी, आम्रपाली, आशर सोसायटी, करन्सी नोटप्रेस, विद्युत भवन या प्रमुख विभागांचा समावेश होतो. या प्रभागात संमिश्र स्वरूपाची लोकसंख्या आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक महापालिका निवडणूक वॉर्ड 26 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 26 मधील राजकीय सद्यस्थिती

मागील सार्वत्रिक निवडणुकीत नाशिक महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवली. मात्र प्रभाग क्रमांक 26 च्या चार वॉर्डात शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले, तर सत्ताधारी भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत अ वॉर्डमधून दिलीप दातीर (शिवसेना), ब वॉर्डमधून हर्षदा गायकर (शिवसेना), क वॉर्ड – अलका आहेर (भाजप), आणि ड वॉर्डमधून भागवत आरोटे (शिवसेना) हे उमेदवार विजयी झाले होते.

नाशिक महापालिका निवडणूक वॉर्ड 26 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

निवडणूक लक्षवेधी ठरणार

मागील निवडणुकीत मनसेच्या पदरात अपेक्षित यश पडलेले नव्हते. यंदा मनसेने भोंग्याच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्याचा प्रभाव महापालिकेतील मनसेच्या मतदारसंख्येवर दिसणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची निवडणूक लक्षवेधी असणार आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्येही भाजप-शिवसेनेत सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.