Nasik NMC Election 2022, ward- 17| नाशिक महापालिका निवडणूक, शिवसेना-भाजपच्या लढाईत प्रभाग क्रमांक 17 तिडके कॉलनीत कोण विजयी ठरणार?

नाशिकची एकूण लोकसंख्या 14,86,053 एवढी आहे. नाशिकमधील अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,14,620 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,07,456 एवढी आहे.

Nasik NMC Election 2022, ward- 17| नाशिक महापालिका निवडणूक, शिवसेना-भाजपच्या लढाईत प्रभाग क्रमांक 17 तिडके कॉलनीत कोण विजयी ठरणार?
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:53 AM

नाशिकः शिवसेनेतील बंडामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची राजकीय समीकरणेच बदलली आहेत. पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुका होत आहेत. नाशिक महापालिकेचाही बिगुल वाजलाय. महापालिका निवडणूक (Municipal Corporation) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरीही मतदार याद्या (Voter’s list) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे अधिकारीही वेगाने कामाला लागले आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरीही यंदा शिवसेना आणि भाजपमध्ये तगडी फाइट पहायला मिळू शकते. प्रभाग क्रमांक 17 मध्ये 2017 मधील निवडणुकांत चार वॉर्ड होते. यापैकी दोन वॉर्ड भाजप तर दोन वॉर्ड शिवसेनेच्या ताब्यात होते. यंदा नवीन प्रभाग रचनेनुसार, तिडके कॉलनीचा परिसर या वॉर्डात प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभागातील आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. त्यानुसार इच्छुक कामाला लागले आहेत. आता आगामी निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजय टिकवून ठेवतात की शिवसेनेची ताकद वाढते, हे पहावे लागेल.

प्रभाग 17 मधील महत्त्वाचे भाग कोणते?

नाशिक महापालिकेच्या हद्दीतील तिडके कॉलनी हा परिसर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 17 मध्ये येतो. तसेच मातोश्री नगर परिसर, सहवास नगर परिसर, गोल्फ ग्राउंड, मिलिंद नगर परिसर, पाटील प्रेस्टीज परिसर या भागांचा समावेश होतो.

लोकसंख्येचं गणित काय?

नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मधील एकूण लोकसंख्या 30,144 एवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीतील मतदार 2534 तर अनुसूचित जमातीचे मतदार 1798 एवढे आहेत.

2017 मधील चित्र काय?

नाशिक महापालिकेत यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये एका प्रभागात चार वॉर्डांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक 17 मधील मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार असे- प्रभाग 17 अ- प्रशांत अशोक दिवे (शिवसेना) प्रभाग 17 ब- मंगला आढाव (भाजप) प्रभाग 17 क- सुमन सातभाई उर्फ अनिता दत्तात्रय (शिवसेना) प्रभाग 17 ड- दिनकर गोटीराम आढाव (भाजप)

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

आगामी 2022 मधील निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील वॉर्डांमधील आरक्षण पुढील प्रमाणे- 17-अ- सर्वसाधारण महिला 17-ब- सर्वसाधारण खुला 17-क- सर्वसाधारण खुला

2017 मधील पक्षीय बलाबल काय?

  • भाजप- 66 (सध्या 64)
  • शिवसेना-35 (सध्या 33)
  • राष्ट्रवादी- 6
  • काँग्रेस-6
  • मनसे-5
  • अपक्ष-4
  • एकूण – 133 नगरसेवक (2017 नुसार)

 हेही महत्त्वाचे…

नाशिकची एकूण लोकसंख्या 14,86,053 एवढी आहे. नाशिकमधील अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,14,620 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,07,456 एवढी आहे. नाशिक महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 19, अनुसूचित जमातीसाठी 10 आणि महिलांसाठी 52 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. त्यापैकी 43 प्रभाग हे तीन सदस्यीय असून एक प्रभाग चार सदस्यीय आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. रमेश पवार हे नाशिक महापालिकेचे आयुक्त आहेत. तसेच पालिकेचे प्रशासकही आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 17 अ

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 17 ब

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 17 क

   
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.