आमदार होऊ पाहणाऱ्यांना प्रभागातचं रोखलं, 11 पैकी 7 नगरसेवक हरले
मुंबई महापालिकेतील तब्बल 11 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील केवळ चारच नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात यशस्वी ठरले (BMC corporator win vidhansabha election) आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेतील तब्बल 11 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील केवळ चारच नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात यशस्वी ठरले (BMC corporator win vidhansabha election) आहेत. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह सात नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. तर शिवसेनेचे रमेश कोरगावकर, दिलीप लांडे, यामिनी जाधव ,भाजपचे पराग शहा, ‘सपा’चे रईस शेख विधानसभेवर निवडून गेले (BMC corporator win vidhansabha election) आहेत.
विधानसभेच्या मुंबईतील 36 जागांसाठी पालिकेतील अनेक नगरसेवक इच्छुक होते. मात्र त्यापैकी केवळ 11 नगरसेवकांना यंदा राजकीय पक्षांनी विधानसभेचे तिकीट दिले. त्याशिवाय 9 नगरसेवकांना पक्षांकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. यात शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला होता. तर विठ्ठल लोकरे हे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करत मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढवली.
याशिवाय पक्षाकडून मिळालेल्या अधिकृत तिकीटांमध्ये शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर (वांद्रे पूर्व), रमेश कोरगावकर (भांडूप पश्चिम), दिलीप लांडे ( चांदिवली), काँग्रेसकडून आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम) आणि जगदीश कुट्टी (अंधेरी पूर्व) यांना उमेदवारी मिळाली.
मनसेकडून संजय तुर्डे (कलिना), समाजवादीकडून पालिका गटनेते रईस शेख (भिवंडी), अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी(भायखळा), भाजपकडून पराग शहा (घाटकोपर) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काहींनी बंडखोरी करुन निवडणूक (BMC corporator win vidhansabha election) लढवली.
मात्र यात शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर (भांडुप प.), दिलीप लांडे (चांदिवली), भाजपचे श्रीमंत नगरसेवक पराग शहा (घाटकोपर पूर्व) आणि सपाचे रईस शेख (भिवंडी) या चार नगरसेवकांनी बाजी मारत आमदारकीची लॉटरी खिशात घातली.
यात दिलीप लांडे यांनी काँग्रेस आमदार नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव केला. तर पराग शहा यांनी भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कापून उमेदवारी मिळवली होती. त्याप्रमाणे पक्षाने ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ (BMC corporator win vidhansabha election) ठरवला.
आमदारकीला विजयी नगरसेवक
- दिलीप लांडे (शिवसेना) चांदिवली मतदारसंघ,
- रमेश कोरगावकर (शिवसेना) (भांडूप पश्चिम मतदारसंघ
- पराग शहा (भाजप) घाटकोपर पूर्व
- रईस शेख (सपा) भिवंडी
आमदारकीला पराभूत नगरसेवक
- विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
- राजुल पटेल (अपक्ष)
- गीता गवळी (अखिल भारतीय सेना)
- जगदीश कुट्टी (काँग्रेस)
- आसिफ झकेरिया (काँग्रेस)
- संजय तुर्डे (मनसे)
- विठ्ठल लोकरे (शिवसेना)
विद्यमान नगरसेवकांसह सहा माजी नगरसेवकही आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव (भायखळा) या एकमेव माजी नगरसेविका विजयी झाल्या. तर काँग्रेसचे सुरेश कोपरकर (भांडूप पश्चिम), अजंता यादव (कांदिवली पूर्व), भाजपचे बंडखोर मुरजी पटेल (अंधेरी), मनसेकडून संदीप देशपांडे (माहीम), राष्ट्रवादीकडून धनंजय पिसाळ (विक्रोळी) हे पराभूत झाले आहेत.
संबंधित बातम्या :
शिवसेनेचं संख्याबळ 61 वर, मिलिंद नार्वेकरांसोबत अपक्ष आमदार विशेष विमानाने मुंबईत!
‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’, आदित्य ठाकरेंसाठी युवासेनेची मोहीम