मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. (Environment minister Aaditya thackeray visit kanjurmarg Metro carshed land)
Follow us
आरे परिसरातील मेट्रो प्रकल्पाचे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळे अखेर मेट्रोचं कारशेड हे कांजूरमार्ग येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं.
आज (14 ऑक्टोबर) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जमिनीची पाहणी केली.
आदित्य ठाकरेंसोबत मेट्रोसह MMRDA चे अधिकारीही उपस्थित होते.
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या भाजपने विविध आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आदित्य ठाकरेंनी या जागेबद्दलही त्यांच्याशी चर्चा केली.
त्यावेळी स्थनिक नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले.