अजित पवार हसले, म्हणाले, प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!

अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं नाव न घेता टोलेबाजी केली.

अजित पवार हसले, म्हणाले, प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!
Gopichand padalkar and ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 1:44 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं नाव न घेता टोलेबाजी केली. “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही (Baramati Vidhan Sabha) त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”, असं अजित पवार म्हणाले. (Even after getting the ticket of the main party BJP, Gopichand Padalkar not secure deposit in Baramati said Ajit Pawar)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण उद्या १३ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण उरकून घेतलं. त्याचवेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं.

अजित पवार म्हणाले, “अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”,

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्तानात आहे. इतिहासात नोंद घेणारं त्यांचं काम आहे. त्यांचं मंदिराच्याबाबत जिर्णोद्धार असो, प्रजाहितकारी म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचं अनावरण हे चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवारांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहे. त्यामुळे आम्ही युवा मित्रांनी मेंढपाळ्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पहाटे केलं.

बारामती विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं? 

महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान (Ajit Pawar on BJP Challenge) मोडीत काढलं होतं. भाजपने बारामतीतून (Baramati Assembly Election result) अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर (Ajit Pawar Vs Gopichand Padalkar) यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त केलं होतं. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा 

(Even after getting the ticket of the main party BJP, Gopichand Padalkar not secure deposit in Baramati said Ajit Pawar)

संबंधित बातम्या  

बारामतीत अजित पवारांचा डंका, पडळकरांसह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला धक्का पोहोचवणारी मिटकरी-पडळकरांची टपोरी भाषा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.