मतदानाला EVM बिघाडीचे ग्रहण, राज्यभरात कुठे कुठे EVM बंद?

मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, मतदानाला मतदान यंत्र बिघाडीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच सर्वात आधी अकोला येथे गुडधीच्या क्रमांक 136 मधील VVPAT मशीन खराब झाल्याने मतदानात अडचण आली. त्यामुळे मतदान सुरु होण्यास उशिर झाला. त्यानंतर राज्यभरातून मतदान यंत्र किंवा VVPAT मशीनमध्ये तांत्रिक […]

मतदानाला EVM बिघाडीचे ग्रहण, राज्यभरात कुठे कुठे EVM बंद?
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:43 AM

मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, मतदानाला मतदान यंत्र बिघाडीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच सर्वात आधी अकोला येथे गुडधीच्या क्रमांक 136 मधील VVPAT मशीन खराब झाल्याने मतदानात अडचण आली. त्यामुळे मतदान सुरु होण्यास उशिर झाला. त्यानंतर राज्यभरातून मतदान यंत्र किंवा VVPAT मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर आल्या.

अकोला : 

अकोला येथे गुडधीच्या क्रमांक 136 मधील VVPAT मशीन खराब झाल्याने मतदानात अडचण आली. त्यामुळे मतदान सुरु होण्यास उशिर झाला. याशिवाय अकोल्यात एका व्यक्तीने EVM फोडल्याचाही प्रकार घडला. मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला. त्या व्यक्तीचे नाव श्रीकृष्ण असे आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

सोलापूर:

सोलापूरमध्ये शरदचंद्र पवार शाळेतील अनेक केंद्रांमध्येही मतदान यंत्रे बंद पडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्या ठिकाणांवरील मशिन बदलवून मतदान सुरळीत करण्यात आले. मात्र, उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात किणी मतदान केंद्रावरही 2 मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला. तेथे 8 वाजून गेले, तरी एकही मतदान झाले नाही. यावेळी प्रशासनाचा मशीन खराब झाल्यास 15 मिनिटात बदलण्याचा दावाही फोल ठरला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे तासभर EVM बंद झाल्याचीही घटना घडली.

बुलडाणा:

बुलडाण्यामधील चिखली तालुक्यात 3 ठिकाणी मशीन बंद पडल्याने 20 मिनिटे उशिरा मतदान सुरू झाले. तालुक्यातील सोनेवाडी, चिखली शहर आणि सवणा येथील मतदान यंत्रांमध्येही बिघाड झाला होता. यानंतर पर्यायी मतदान यंत्रे उपलब्ध करुन दिल्याने मतदान पुन्हा सुरु झाले.

बीड:

बीड जिल्ह्यात 7 मतदान केंद्रावरील EVM आणि VVPAT मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर तत्काळ ती यंत्रे दुरुस्तही करण्यात आली. यात गेवराई, आष्टी, परळी, माजलगाव, केज यांचाही समावेश होता.

लातूर:

लातूरमध्ये दयानंद विधी महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली. यानंतर तांत्रिक साहाय्य मागवण्यात आले.

अमरावती:

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावातही जिल्हा परिषदेच्या शाळेतील बूथ क्रमांक 312 मधील VVPAT मशीन सुरु न झाल्याने सुरुवातीचा तब्बल एक तास मतदान प्रक्रियाच सुरू झाली नाही. त्यानंतर एक तासाने तहसील प्रशासनाने मशीन बदलून दिले आणि मतदानाला सुरुवात झाली.

काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार, तर काही ठिकाणी वाद

हिंगोलीतील औंढानागनाथ तालुक्याच्या जामगव्हान येथे मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये ओळख पत्रावरुन वाद झाला. वादामुळे अर्धा ते पाऊण तास मतदान प्रकिया थांबली होती. तहसिलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील 2 गावांचा मतदानावरच बहिष्कार टाकला. बीड तालुक्यांतील कुंभारी गावातील नागरिकांनी गाव पुनर्वसन आणि तळ्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने मतदानास नकार दिला. दुसरीकडे बीडमधीलच सौंदाना गावाने स्वातंत्र्यापासून रस्ता न झाल्याच्या रागातून मतदानावर बहिष्कार टाकला.

संबंधित बातम्या: 

पहिल्या टप्प्यातील मतदानात EVM मध्ये घोळ, विरोधकांचा आरोप 

मतदानादरम्यान आमदाराने EVM फोडलं, ईव्हीएमचे तुकडे 

भाजपकडून EVM मशीनशी छेडछाड? या आरोपामागील सत्य काय?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.