Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehbaz Sharif : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाहून दिल्या चोराच्या घोषणा, 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज एका शिष्टमंडळासह तीन दिवसांच्या अधिकृत सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांच्यासोबत माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्ली सदस्य शाहजैन बुग्ती हे देखील आहेत.

Shehbaz Sharif : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाहून दिल्या चोराच्या घोषणा, 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाहून दिल्या चोराच्या घोषणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:17 PM

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे सध्या सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दौऱ्यावर आहेत. तिथला एक व्हिडीओ प्रचंड व्हायल होत आहे. जेव्हा पंतप्रधान शाहबाज शरीफ हे मदिना येथील मस्जिद-ए-नबवीमध्ये प्रवेश करत होते. त्यावेळी तिथल्या लोकांनी चोराच्या नावाने घोषणा दिली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. घटनास्थळी घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे

एएनआयच्या बातमीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज एका शिष्टमंडळासह तीन दिवसांच्या अधिकृत सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांच्यासोबत माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्ली सदस्य शाहजैन बुग्ती हे देखील आहेत. ही घटना घडल्यानंतर औरंगजेब यांनी नाव न घेता अशा प्रकारच्या निषेधांसाठी इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे.

12 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलरच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या होणारी घट थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इम्रान खान यांच्या कार्यकाळात सौदी अरेबियाने कर्जबाजारी देशाला ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत दिली होती. पेमेंट बॅलन्सचे संकट आणि परकीय चलनाच्या साठ्यात घट टाळण्यासाठी पाकिस्तानला सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. शाहबाज शरीफ यांनी 11 एप्रिल रोजी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत इम्रान खान यांना अविश्वास ठरावातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.