Abdul Sattar : ठाकरेंना सांगितलं वसईला जातोय, पोहोचले गुजरातला, पोलीस, नाकाबंदी आणि…; ‘त्या’ दिवशी काय घडलं? सत्तार भडाभडा बोलले

Abdul Sattar : मातोश्रीवर जाण्याचा रस्ता शिंदेंना माहीत आहे. आम्ही त्यांच्या रिक्षात बसलो आहोत. 50 लोक त्यांच्या रिक्षात आहोत. त्यांचा रस्ता मातोश्रीच्या मार्गाने गेला तर वेल अँड गुड नाही. गेला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

Abdul Sattar : ठाकरेंना सांगितलं वसईला जातोय, पोहोचले गुजरातला, पोलीस, नाकाबंदी आणि...; 'त्या' दिवशी काय घडलं? सत्तार भडाभडा बोलले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:54 PM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 50 आमदारांना घेऊन बंड केलं. केवळ शिवसेनेचेच नव्हे तर अपक्ष आमदारांनाही त्यांनी सोबत घेतलं. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदारांनी बंड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या आमदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड केल्याने त्याचंही अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं हे बंड कशामुळे झालं? का झालं? सर्व आमदारांचं मेतकुट कसं जमलं अशी एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत थोडं भाष्य केलं आहे. शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar)  यांनीही त्यावर भाष्य करताना संपूर्ण हकिकतच ऐकवली आहे. बंडामागची कारणमिमांसा ऐकवतानाच अनेक किस्सेही त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला मंत्रीपदाची हाव नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही सत्तार म्हणाले. टीव्ही9 मराठीच्या रिपोर्टरने विचारलेल्या प्रश्नांची सत्तार यांनी दिलेली उत्तरे जशास तसे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

अब्दुल सत्तार: त्या दिवशी मतदान झाल्यावर शिंदे नाराज दिसले. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. अनिल देसाई आणि शिवसेनेचे तीन नेते आत बसले होते. शिंदे बाहेर आमदारांसोबत बसले. ते नाराज होते. निर्णय लागण्याआधीच आमचा निर्णय लागला

हे सुद्धा वाचा

अजित दादासोबत बसलो होतो. दीड तास बसलो. जयंत पाटील होते. प्रासंगिक करार तिथला संपू लागला, असं मी त्यांना म्हटलं. त्यांच्या लक्षात आलं नाही. जयंत पाटलांच्या लक्षात आले. ते म्हणाले, तिकडचा प्रासंगिक करार संपला असेल तर आमच्याकडे या. सहज हसता हसता बोलले. मी म्हटलं त्याबद्दल विचार करतो. मी दोन तास बसलो. दादांना वाटलं यांना बिझी ठेवलं. पण तसं नव्हतं

एकत्रं निघायचं हे कधी ठरलं?

अब्दुल सत्तार: आधी आम्हाला सांगितलं ठाण्यात बसायचं. नंतर सांगितलं हॉटेलमध्ये बसायचं आणि चर्चा करायची. त्यानंतर आम्ही जात असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मी म्हटलं मी वसई, विरारला कार्यक्रमाला चाललो. माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता आहे. त्याचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांचा पहिला फोन मलाच आला. ते म्हणाले, बघा काही तरी गडबड आहे. मी म्हटलं काही गडबड नाही. आमची गाडी सुरू आहे. नंतर आम्ही हॉटेलवर गेलो. पुढे ढाबा आला. तिथे शिंदे आले. मग एकमेकांना फोन केले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. इकडे रिझल्टही आला नव्हता. पण आम्ही निघालो. नंतर आपल्या बॉर्डरची नाकाबंदी करण्याचे आदेश आले. शिंदेही मंत्री आहेत. अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. त्यांनी पोलिसांना हटकलं. आम्ही काय स्मगलर आहे का? चोर आहे का? आम्ही कुठेही जाऊ शकतो असं शिंदेंनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आम्हाला एक पर्यायी लाईन उघडी करून दिली. एक लाईन क्लिअर करून दिली. रस्ता जाम झाला होता. गुजरात हायवेवर प्रचंड वाहने असतात. आम्ही गुजरातला गेल्यावर गुजरातच्या पाट्या पाहिल्या. बॉर्डवर येईपर्यंत वाटलंही नाही गुजरातला आलो. जाममधून आम मिळाला खायला.

शिंदे काही छोटे नेते नाहीत. त्यांचे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आहे. त्याचा वापर करून त्यांनी मार्ग काढला. त्यांनी काही अधिकाऱ्यांना फोन लावले. त्या अधिकाऱ्याने मेन लाईनवर यायला सांगितलं. एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर येताना कैलास पाटील नावाचा आमदार लघवीच्या निमित्ताने उतरला. तो घाबरला होता. आमच्यातून निघाला. तेव्हा शिंदे म्हणाले जाऊ द्या त्यांना.

किती गाड्या तुमच्यासोबत होत्या? किती आमदार होते?

अब्दुल सत्तार: आम्ही किती लोकं आहेत मोजली. दहा अकरा गाड्या होत्या आमच्या. प्रत्येक गाडीत दोन तीन, दोन तीनजण बसले होते. गप्पा मारत मारत आम्ही निघून गेलो. आम्ही बॉर्डरवर गेल्यावर तिथे पोलीस तयार होती. आम्हालाही आश्चर्य वाटलं. नंतर एका हॉटेलात गेलो. नितीन देशमुख नावाचा आमदार आहे. तो म्हणाला माझी छाती दुखत आहे. तो फार बैचेन होता. त्याला विचारलं तुझी अडचण काय? म्हणाला, बायकोकडे जायचं आहे. त्याला रुग्णालयात नेलं. पण तो म्हणाला, मला बायकोकडे जायचं आहे. मग त्याच्यासाठी चार्टड प्लेन आणलं. त्याला अकोल्याला पाठवून दिलं. त्याने आईबापाची शपथ घेऊन सांगावं.

सर्वजण स्वत:हून आले का?

अब्दुल सत्तार: काही लोक बसने आली. ट्रेनने आली. हा एकत्र उठाव होता. शिंदेंकडे महत्त्वाची खाती होती. त्यांना काहीच अडचण नव्हती. पण आमदारांमध्ये अस्वस्थता होती. म्हणून त्यांनी उठाव केला. माझ्या मतदारसंघातील कामेही राहिली होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून सिल्लोड सोयगावमध्ये जेवढी कामे झाली नव्हती, तेवढी कामे त्यांनी चार दिवसात मंजूर केली आहे. वॉटर ग्रीड सहाशे साठ कोटीची. त्याचा जीआर निघाला. जैस्वाल साहेब परदेशात होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला. दुसऱ्या दिवशी त्याचा जीआर निघाला. सिल्लोडमधील सर्व पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. सर्व गावांना फिल्टर पाणी मिळणार आहे. 80 कोटी 90 लाख रुपयांची सूत गिरणी मंजूर केली. आणि 50 टक्के निधीही दिला. त्यानंतर बॅरेजेसपासूनची अनेक कामे झाली. महसूलची जमीन घेतली. त्याला 12 कोटी रुपये हवे होते. ते पैसेही दिले. नगरपालिकेची इमारत बनवण्यासाठी.

माझ्या मतदारसंघात शिवाजी महाराजांचं स्मारक बनवायचं आहे. दोन वर्षापासून फाईल पडली होती. मंजुरी मिळाली. पण आदित्य ठाकरेंनी जमीनच दिली नाही. शिंदेंनी तात्काळ दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करत आहे. तिथे पैसा मंजूर केला. पण जमीन नव्हती अशा अनेक गोष्टी शिंदेंनी केल्या. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये क्रिकेटमध्ये चौके छक्के मारले तर सामना पलटतो. तशा मला एक हजार कोटीच्या योजना मंजूर करून दिल्या. त्यानंतर मी त्यांना सांगितलं पहिला कार्यक्रम सिल्लोडला झाला पाहिजे. त्यावर 24 आणि 25 तारखेत कधीही बोलवा असं त्यांनी सांगितलं.

माझा प्रासंगिक करारचं त्यांच्यासोबत होता. मी काँग्रेस सोडल्यानंतर मी भाजपमध्ये जाणार होतो. पण शिंदे यांनी मला शिवसेनेत घेतलं. त्यांच्यामुळे मी आलो. माझ्या ध्यानीमनी नव्हतं. काँग्रेसमध्ये असताना माझे नेते अशोक चव्हाण होते. राजकारणात कोण तरी नेता लागतो. म्हणून अशोक चव्हाण हे माझे नेते होते. चव्हाणांची जन्मभूमी औरंगाबाद आहे. कर्मभूमी नांदेड आहे. आता एकनाथ शिंदे माझे गॉड फादर आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत अस्वस्थ होते का?

अब्दुल सत्तार: मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगतो. मी खरी परिस्थिती सांगतो. शिंदे आणि शिवसेनेत थोडा थोडा वाद सुरू होता. त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या. शिंदे खूप नाराज होते. याबाबत तेच तुम्हाला अधिक सांगू शकतात. मी शिवसेनेत गेलो. तेव्हा शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी सिल्लोडमध्ये नव्हता. हजार मतेही शिवसेनेची नव्हती.

शिंदेंनी आपल्याला काय पाहिजे हे कधीही म्हटलं नाही. पण शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना होती. रात्री दोन वाजताही शिंदे फोन उचलतात. ते धावून येतात. काही नेत्यांना भेटीची मागणी केली तरी ते भेटायचे नाही. मला कोरोना झाल्यावर शिंदे लिलावतीत दाखल झाले होते. तेव्हा ते किट्स घालून मला भेटायला आले. मलाच नाही तर अनेकांना ते भेटायला गेले. जेव्हा लोक कोरोनात एकमेकांना भेटत नव्हते. तेव्हा तो माणूस भेटायला आला.

दयाळू मयाळू असा नेता कधीच भेटणार नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे भाषण केलं ते अप्रतिम होतं. अत्यंत साध्या शब्दात ते बोलले. मनापासून बोलले. इतकं मनापासून बोलणारा नेता मी अजून पाहिले नाही. ते लिहिलेलं भाषण नव्हतं. ते आत्मा आणि परमात्म्याला साक्षी ठेवून बोलत होते. त्यावेळी 100 लोकांना मी रडताना पाहिलं. मी अनेक मयतींना गेलो. किती मरले, किती खपले पण मी कधी रडलो नाही. त्या दिवशी डोळे ओलावले. एखादा शेतकरी मेला तरी शिंदेंना त्याची जाणीव आहे. कुणाचा अपघात झाला तरी त्याची जाणीव ठेवणारा नेता आहे. आम्ही शेतकरी आहोत. माझे वडील शेतकरी होते. आत्महत्याग्रस्त तालुक्यात काम करण्याची माझी इच्छा आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखायची आहे. एक समिती नेमून शेतकरी आत्महत्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करायचा आहे, असं शिंदे म्हणाले. त्यांचं हे वाक्य मला खूप आवडलं.

म्हणजे शिंदे 100 आमदार करतील?

अब्दुल सत्तार: कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना त्रास झाला नाही तर… नाही तर या 100 जणांमध्ये दोघात भांडणं लागून जायची, असं मी बोलू नये. यांचे 150 म्हणजे 130 आमदार आहेत. त्यापैकी 50 आमदारांचा चार्ज शिंदेंकडे दिला. अन् ही तुमची निशाणी आहे तुम्ही वाढवा असं भाजपने सांगितलं तर हे 50 चे 100 करायला ही कमी पडणार नाही. माणसं जोडणारा माणूस आहे.

मला आठवतंय. माझा मुलगा समोर बसलाय. जेव्हा पहिला लॉकडाऊन होता. तेव्हा शिंदे यांचा तिसरा फोन मला आला. सत्तारभाई एफसीआयचे गहू पाठवू का? तांदूळ पाठवू का? किराणा सामान पाठवू का? अरे..माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी त्यांनी विचारलं. कुठं मन असेल त्यांचं. माझ्यासाठी नाही तर 50 आणि 100 आमदारांना त्यांनी सांगितलं असेल. त्यांनी सरकारकडून खरेदी केलेला गहू असेल. डायरेक्ट किराणा सामान घ्या. त्याचं बिल पाठवा असं सांगायचे आणि किराणा दुकानाला ऑनालाईन पैसे पाठवायचे. काय माणूस आहे. या काही विसरणाऱ्या गोष्टी आहे का? माझ्या आयुष्यातील हा पहिला नेता आहे. चार मुख्यमंत्री आणि हजार नेते पाहिले असेल. पण असा नेता नाही.

आदित्य – उद्धव ठाकरेंचं काय?

अब्दुल सत्तार: कसं आहे या दोघा नेत्यात समन्वय करण्याएवढा मी एवढा मोठा पुढारी नाही. शेवटी शिंदे जे निर्णय घेतली तो आम्हा सर्वांना मान्य राहील. त्यांचं जुळंल तर चांगलंच आहे. त्यांनी सांगितलं शिवसेना सोडून द्या तर सोडून देऊ. त्यांनी सांगितलं राहा तर राहू. त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा तर करू. शेवटी कुणाच्या तरी विश्वासावर मतदारसंघ चालतोय. शिंदेंची ओपनिंग सुरू झाली. तुम्ही पुढे पुढे पाहा ते लोकप्रिय नेते ठरेल.

मातोश्रीवर जाण्याचा रस्ता शिंदेंना माहीत आहे. आम्ही त्यांच्या रिक्षात बसलो आहोत. 50 लोक त्यांच्या रिक्षात आहोत. त्यांचा रस्ता मातोश्रीच्या मार्गाने गेला तर वेल अँड गुड नाही. गेला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शेवटी नेता म्हणून कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. त्यांनीच मला शिवसेनेत नेले. मी काही शिवसैनिक नाही.

तुम्ही संभाजी नगर म्हणणार का?

अब्दुल सत्तार: सरकारने कदाचित हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात त्याला स्टे आहे. त्याची लिगल पॉसिबिलिटी काय आहे ती तपासावी लागेल. शासनानाने निर्णय घेतला तर तुम्हाला बोलावच लागेल. कायद्याने तो निर्णय घेतला तर मान्य करावंच लागेल. शिंदेंनी तो निर्णय घेतला. आता मोदी आणि शहा बघतील. मुस्लिम समाजातील लोक शेवटपर्यंत बाबरीसाठी भांडले. पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सर्वांनी मान्य केला. आताही तेच होईल.

तुम्ही हिंदुत्ववादी आहे का?

अब्दुल सत्तार: मी 2019ची निवडणूक एमआयएमकडून लढली नाही. शिवसेना भाजपकडून लढली. तेव्हा ते काय मुस्लिम होते का? की मागासवर्गीय होते का? ते हिंदूच होते. ज्या पक्षात जातो त्यांची धोरणे मान्य करावीच लागतात. नाही तर पक्ष सोडावा लागतो. दोनच पर्याय असतात धोरण मान्य करणे किंवा पक्ष सोडणे.

मंत्रिपदाचं गिफ्ट कधी मिळणार?

अब्दुल सत्तार: ज्या दिवशी शिंदे ठरवतील त्या दिवशी.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.