Uday Samant : उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षाविरोधी कारवायांचा ठपका

अखेर मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि  यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची शिवसेनेतून (Shiv Sena) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली.

Uday Samant : उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षाविरोधी कारवायांचा ठपका
उदय सामंतImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 8:46 AM

मुंबई : अखेर मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि  यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची शिवसेनेतून (Shiv Sena) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाच्या उपनेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेते मोठी बंडखोरी पहायला मिळाली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यांच्या या बंडाला शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या गटाने पाठिंबा दिला. यामध्ये उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचा देखील समावेश होतो.  एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ज्यांनी ज्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यावेळी पाठिंबा दिला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे.

पक्षाविरोधी कारवायाचा ठपका

उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात  आली आहे. त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायांचा ठपका ठेवत यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपामध्ये उदय सामंत यांना उद्योग खाते मिळाले आहे. मात्र आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेकांवर कारवाई

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने शिंदे यांना पाठिंबा दिला होता. अपक्ष आणि शिवसेनेचे असे एकत्र मिळून जवळपास 50 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. आमदारांसोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी झाले होते. आता जे जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता उदय सामंत आणि यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.