काँग्रेसशी संबंधित 687 फेसबुक पेज डिलीट
मुंबई: सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. देशभरात सर्वत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर फेसबुक या सोशल मीडिया कंपनीने काँग्रेस पक्षाचे 687 पेज आणि त्यासंबंधीत व्यक्तिगत खातीही हटवले आहेत. ऐन निवडणुकीत अशाप्रकारे फेसबुक पेज हटवल्याने काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा […]
मुंबई: सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. देशभरात सर्वत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर फेसबुक या सोशल मीडिया कंपनीने काँग्रेस पक्षाचे 687 पेज आणि त्यासंबंधीत व्यक्तिगत खातीही हटवले आहेत. ऐन निवडणुकीत अशाप्रकारे फेसबुक पेज हटवल्याने काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या होत्या. येत्या 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याशिवाय फेसबुक, ट्विटर, युट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सोशल मीडिया पेजवर राजकीय बातम्या, जाहिरात, पक्ष यावरही निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. त्यानुसार अनेक पक्ष प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे फेसबुकच्या निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारच्या वेळी काँग्रेस पक्षाचे 687 फेसबुक पेज आणि त्यासंबंधीत व्यक्तिगत खातीही आहेत.
Reuters: Facebook says removing 687 pages, accounts linked to Congress party ahead of polls pic.twitter.com/sVjMe1I89V
— ANI (@ANI) April 1, 2019
फेसबुकच्या म्हणण्यानुसार, या पेजवरुन गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहार सुरु होते. त्याशिवाय या पेजचे अॅडमिन स्थानिक बातम्या, राजकीय मुद्दे, आगामी लोकसभा निवडणुका व त्यातील उमेदवारांचे विचार शेअर करत असल्याने हे पेज बंद करण्यात आले आहेत. त्याशिवाय फेसबुकने सोमवारी सकाळी पाकिस्तानचेही काही फेसबुक पेज बंद केले आहेत. विशेष म्हणजे या पेजवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर ही टीका करण्यात येत होती.
निवडणूक आयोगाची सोशल मीडियासाठी नवी नियमावली :
- कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला अर्ज दाखल करतेवेळी सोशल मीडियावरील अकाऊंटची माहिती देणे गरजेचं आहे.
- तसेच आता कोणत्याही राजकीय जाहिरातींसाठी प्रमाणपत्र गरजेचं असणार आहे.
- त्याशिवाय निवडणूक आयोग गुगल, फेसबुक, ट्विटर आणि यूट्युब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील राजकीय पक्षांच्या जाहिरातींची पडताळणी करणार आहे.
- विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षांना सोशल मीडियावरील जाहिरांतीवरील खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे.
पहा व्हिडीओ :