Devendra Fadnavis : फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी; आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा?
नव्या सरकारच्या सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. फडणवीस सरकारचा शपथविधी 1 जुलैला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सत्तास्थापनेसंदर्भात भाजपची (BJP) आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक आहे.
मुंबई : नव्या सरकारच्या सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा शपथविधी 1 जुलैला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सत्तास्थापनेसंदर्भात भाजपची (BJP) आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil), गिरीश महाजन, प्रविण दरेकर, मुनगंटीवार आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर भाजप आजच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे आज दहा वाजता शिंदे गटाची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैाठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिंदे गटासोबत मिळून भाजप सरकार स्थापन करणार आहे. एक जूलै रोजी म्हणजे उद्याच फडणवीस सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
भाजपाची आज बैठक
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रविण दरेकर, मुनगंटीवार आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर भाजप आजच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे आज गोव्यात शिंदे गटाची देखील सकाळी दहा वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. शिंदे गट आणि मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपाच्या जल्लोषावर शिंदे गटाचा आक्षेप
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष साजरा करण्यात आला. एकोंमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. यावर आता एकनाथ शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आमची लढाई ही सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. आमच्याकडे मंत्रीपद असताना आम्ही सत्तेसाठी का बंड केले असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर जो जल्लोष झाला तो चुकीचा आहे. तसेच प्रतिक्रिया देताना जर भान राखले पाहिजे. जे अधिकृत प्रवक्ते आहेत त्यांनीच बोलावं असं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.