BJP : चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करुन फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं? संजय राऊतांचं सूचक विधान

रोखठोक या सदात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट फडणवीसांवर टीका कालीय. त्यात ते लिहितात, 'पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते.'

BJP : चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करुन फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं? संजय राऊतांचं सूचक विधान
शिवसेना नेते संजय राऊत, भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटीलImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 8:47 AM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागलं. बंडखोर एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या राज्यातील मोठ्या नेतृत्वाला एकनात शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागत असल्याची टीका मागच्या काही दिवसांपासून होतेय. तर फडणवीसांना हा भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाचा मोठा झटकाही मानला जातोय. या सगळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उपमुख्यमंत्री करा आणि मला प्रदेशाध्यक्ष करा, ही देवेंद्र फडणवीसांची मागणी देखील केंद्रीय नेतृत्वानं मान्य न केल्यानं त्यांच्यावर अन्याय झाल्याचं चित्र आहे. भाजपच्या गोटात हे सगळं सुरू असताना शिवसेनेनं याच मुद्द्यावर बोट ठेवत फडणवीसांना लक्ष केलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या (saamana) ‘रोखठोक’ या शिवसेना नेते संजय राऊतांच्या सदरातून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

फडणवीसांवर शिवसेनेची टीका

रोखठोक या सदात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट फडणवीसांवर टीका कालीय. त्यात ते लिहितात, ‘पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा,’अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली.’

‘हाताखाली काम करण्याचे फर्मान’

‘महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्या म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांनी श्रेय देत होता. पण, सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे.’

हे सुद्धा वाचा

‘काळाने फडणवीसांवर घेतलेला सूड’

‘2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे.’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.