माझ्या नावाने फेक एफआयआर बनवली, सोमय्यांनी सांगितलेल्या एफआयआरमध्ये नेमकं काय?

 किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यावरून आता आरोप-प्रत्योरोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणात जी एफआयआर (fir) तयार करण्यात आली, ती फेक असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माझ्या नावाने फेक एफआयआर बनवली, सोमय्यांनी सांगितलेल्या एफआयआरमध्ये नेमकं काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 10:52 AM

मुंबई : किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यावरून आता आरोप-प्रत्योरोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणात जी एफआयआर (fir) तयार करण्यात आली, ती फेक असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल खार पोलीस स्टेशन येथे माझ्यावर जो हल्ला झाला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. मी पोलीस स्टेशनला पोहोचण्याधीच तिथे सत्तर-ऐंशी शिवसैनिक जमले होते. माला त्यादरम्यान शिविगाळ देखील करण्यात आली. पोलिसांना त्यांनी सांगितले की आम्ही हल्ला करणार आहोत, मात्र पोलिसांनी सांगितले की आम्ही जबाबदारी घेतली. पण गेट उघडताच हल्ला झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले.

सोमय्यांचा नेमका आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी माझ्या नावाने फेक एफआयआर बनवल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराला पोलीस आयुक्त संजय पांडे हेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जी एफआयआर बनवली त्यात त्यांनी असे म्हटले की, माझ्या वाहनापासून शिवसैनिक हे 100 मिटर दूर आहेत, तसेच माझ्या गाडीवर लांबून दगड भिरकवण्यात आला. असे पांडे यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे माझ्या गाडीवर जवळून दगड फेकण्यात आला. मी या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो. मी या एफआयआरवर सही करण्यास नकार दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना फोन

माझ्यावर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केला होता, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच बनावट एफआयआर देखील बनवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं आहे,  याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहे. पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी घेतली होती, तर तिथे इतके लोक कसे काय जमले असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?

Kirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार; किरीट सोमय्या यांचा थेट आरोप

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.