अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये सध्या रणधुमाळी सुरु आहे. 9 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर राजकारण ढवळून निघालंय. राज्यात सध्या फक्त अहमदनगरच्या राजकारणाची चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण, नगरचं राजकारण हे नेहमीच हटके असतं. सध्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणामुळे नगरमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या […]

अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये सध्या रणधुमाळी सुरु आहे. 9 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर राजकारण ढवळून निघालंय. राज्यात सध्या फक्त अहमदनगरच्या राजकारणाची चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण, नगरचं राजकारण हे नेहमीच हटके असतं. सध्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणामुळे नगरमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. मात्र सध्या चर्चा आहे ती इथल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची. नगरचे राजकारण हे तीन परिवांच्या अवती-भोवती फिरत असतं. कोतकर-जगताप आणि कर्डिले हे सर्वच वेगवेगळ्या पक्षात आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्र.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.

नगरच्या राजकारणात कर्डिले हे नेहमीच वरचढ ठरले आहेत. मात्र या निवडणुकीतून भाजपने कर्डिले यांना दूरच ठेवलंय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप हे नगचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी भाजपाचेच प्रमुख विरोधक असणार आहेत. कर्डिलेंच्या हातात निवडणुकीची धुरा दिली तर ते राष्ट्रवादीशी सेटिंग करतात आणि आपल्या जावयाला फायदा होईल, असं बेरजेचं राजकारण करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. तर या राजकारण्यांमुळे मात्र नगरचा विकास खुंटला आहे, असं जाणकारांचं मत आहे.

कसं आहे सोयऱ्या-धायऱ्यांचं राजकारण?

कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत. आता त्यामुळे पुन्हा सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे.

कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यतील बुऱ्हानगर भागात राहतात. मात्र त्यांचे काही मतदार हे नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात येतात. त्यामुळे नगर शहराच्या राजकारणात त्यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं. तर त्यांचे व्याही भानुदास कोतकरांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. गेल्या 40 वर्षांपासून केडगाव परिसरात कोतकर कुटुंबाची दहशत आहे. भानुदास कोतकर यांना तीन मुलं आहेत, तर मोठ्या मुलाची पत्नी ही कर्डिले यांची मुलगी आहे. त्यामुळे कोतकर कोणत्याही पक्षात असले तरी त्याला आतून कर्डिलेंचा पाठींबा असतोच, अशी चर्चा शहरात नेहमीच असते.

बाजार समितीच्या राजकारणात कर्डिले आणि कोतकर हे आपल्या हातात सत्ता रहावी यासाठी आपल्या सोयीनुसार राजकारण करतात. महापालिका निवडणुकीत देखील कार्डिलेंचे दुसरे व्याही आमदार अरुण जगताप यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कर्डिले आणि जगताप यांची छुपी युती असल्याची चर्चा शहरात नेहमीच असते. त्यामुळे पक्ष कोणतेही असो, किंगमेकारच्या भूमिकेत कर्डिलेंचंच नाव पुढे येत असतं.

या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाचा फायदा शिवसेनेने नेहमीच घेतलाय, असं राजकीय विश्लेषक सांगतात. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना एकाच मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. हे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा एकच नारा शिवसेना नेहमी देत असते. शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांनी 25 वर्षात भावनिक राजकारण करून निवडूनका जिंकल्या आहेत. तसेच गेल्या सात महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण, त्यामुळे या सर्वांचं भांडवल करून पुन्हा शिवसेना भावनिक राजकारण करणार हे निश्चित आहे. मात्र या सर्वच राजकारणात नगरचा विकास खुंटतोय. त्यामुळे ही निवडणूक किमान विकासाच्या मुद्द्यावर व्हावी, अशी इच्छा नागरिकांची आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.