Fight Between MLAs: एकनाथ शिंदेच्या बंडखोर आमदारांचा गुवाहाटीमध्ये राडा; हॉटेलमध्येच दोन आमदारांमध्ये तुफान मारामारी?

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. आतापर्यंत 40 पेक्षा अधित आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत. मात्र, आता याच आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचे समजते.

Fight Between MLAs: एकनाथ शिंदेच्या बंडखोर आमदारांचा गुवाहाटीमध्ये राडा; हॉटेलमध्येच दोन आमदारांमध्ये तुफान मारामारी?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 4:02 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडखोरी मुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये(Guwahati) गेले आहेत. याबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीमध्ये राडा घातला आहे. हॉटेलमध्येच दोन आमदारांमध्ये तुफान मारामारी झाल्याचे वृत्त समोर आहे. यामुळे या बंडखोरांमध्येच मतभेद तर सुरु झाले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत. मात्र, आता याच आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे हे आमदारांसह हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये थांबले आहेत. याच हॉटेलमध्ये दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि अन्य एका आमदारांमध्ये ही मारामारी झाली आहे.

या मारामारीचे वृत्त माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फेटाळले आहे. अबीटकर या पूर्वी नाराज होते. मात्र आता ते नाराज नाहीत. रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. आज आम्ही एकत्र शाहू जयंती साजरी केली असल्याचेही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी टीव्ही 9मराठीला सांगीतले.

राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीत दाखल

दरम्यान, शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री गेला असण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या ३७ हून जास्त शिवसेना आमदार आणि १० हून जास्त अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. आता त्यात उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.