रणांगण सोडून पळणाऱ्यांनो आता डिपॉझिट वाचवण्याची लढाई करा : आशिष शेलार
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे. शिवसेना-भाजपच्या युतीवर विरोधकांकडून […]
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.
शिवसेना-भाजपच्या युतीवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली आहे. तर मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आघाडीच्या उमेदवारांना गर्भित इशारा दिलाय. आतापर्यंत मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रंणागण सोडून पळत होते. त्यामुळे उमेदवार मिळवण्याची लढाई लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आता डिपॉजिट वाचविण्याचीच लढाई लढावी लागणार, असं ट्वीट शेलारांनी केलंय.
आतापर्यंत मुंबईतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार रंणागण सोडून पळत होते त्यामुळे उमेदवार मिळविण्याची लढाई लढणा-या कॉंग्रेस -राष्ट्रवादीला आता डिपॉजिट वाचविण्याचीच लढाई लढावी लागणार!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 18, 2019
मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसचा सुपडासाफ केला होता. अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघांमध्येही काँग्रेस उमेदवारांचा लाखोंच्या फरकाने पराभव झाला होता. यावेळी आशिष शेलारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा आव्हान दिलंय.
शिवसेना भाजपची युती
युतीच्या चर्चेपूर्वीच शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरी प्रश्नांसह अनेक अटी भाजपने मान्य केल्या. यापैकी पहिली अट म्हणजे लोकसभेचा फॉर्म्युला. शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.
दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेची तिसरी अट म्हणजे कोकणातील नाणारमधला रिफायनरी प्रकल्प. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केलाय. स्थानिकांनी शिवसेनेकडे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी दाद मागितली होती. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे.