“फाईल्सवर कालच सही केली, आता…”, लाडकी बहिण योजनेबद्दल अर्थमंत्री अजित पवारांची महत्त्वाची माहिती

"माझ्या मनात या माय-माऊलीसाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी खंत होती. त्यामुळेच आम्ही ही योजना सुरु केली", असे अजित पवारांनी म्हटले.

फाईल्सवर कालच सही केली, आता..., लाडकी बहिण योजनेबद्दल अर्थमंत्री अजित पवारांची महत्त्वाची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 2:29 PM

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेद्वारे 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. गेल्या 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. आता या योजनेबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधील भाषणादरम्यान या योजनेबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती दिली.

महिलांना सबळ करणे महत्त्वाचे

आम्ही महिलांना आरक्षण दिलं आहे. पण तरीही महिलांना सबळ करणे महत्त्वाचे आहे. माझं कुटुंब सुखात राहिल पाहिजे, यासाठी माय-माऊली स्वत:च्या पोटाला चिमटा काढत असते. माझ्या मनात या माय-माऊलीसाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी खंत होती. त्यामुळेच आम्ही ही योजना सुरु केली, असे अजित पवारांनी म्हटले.

17 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार

माझ्या मनात खोटं नाही, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. कालच रात्री मी, मुख्यमंत्री आम्ही सगळे चर्चा करत बसलो होतो. या बैठकीत आम्ही लाडकी बहिण योजनेबद्दल चर्चा केली. ही योजना 90 टक्के महिलांपर्यंत पोहोचली आहे. कालच मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलो आहे. येत्या 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असेही अजित पवार म्हणाले.

ही योजना कायमस्वरूपी असणार

या योजनेवरुन विरोधक म्हणतात की हा चुनावी जुमला आहे. पण आम्ही लाँग टर्म राजकारण करणारे आहोत. जर कोणी खोटं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला बळी पडू नका. ही योजना कायमस्वरूपी असणार आहे. तसेच ही योजना सुरु ठेवायची तर तुम्ही पण आमची बटण दाबली पाहिजेत, असेही अजित पवारांनी सांगितले.

तसेच प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये आपण 1 हजारच्या टप्प्याटप्प्याने देणार आहे. काही ठिकाणी 65 पुढील महिलांसाठी देखील निराधार योजना सुरु आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहावं यासाठी वयश्री योजना आहे. महिलांसाठी पिंक रिक्षा देखील आहे, असेही अजित पवारांनी म्हटले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.