शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना पहिला भावनिक संदेश

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या निर्णयाची माहिती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना देण्याची हिंमत झाली नसल्याचं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना नमूद केलं होतं. मात्र, आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक कार्यक्रमात बोलताना अहिर यांनी अखेर शरद पवारांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना पहिला भावनिक संदेश
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 3:50 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या निर्णयाची माहिती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना देण्याची हिंमत झाली नसल्याचंही त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना नमूद केलं होतं. मात्र, आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक कार्यक्रमात बोलताना अहिर यांनी अखेर शरद पवारांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त आहे.

सचिन अहिर म्हणाले, “पवार साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही निश्चित माझ्या ह्रदयामध्ये आहात. तुमच्यासारख्या नेत्याचा आशिर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत कालही होता, आजही आहे आणि उद्याही ठेवा. एका नवीन भूमिकेतून मी जातो आहे. हे माझ्यासाठी कठीण आहे, पण अशक्य नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांनीही मला राष्ट्रवादीसारखेच कौटुंबिक संबंध ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी मला या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही, असाही विश्वास दिला आहे. त्या जिद्दीनं मी शिवसेनेत आलो आहे. इतकी वर्ष मी तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत काम केलं आहे. आता नवीन प्रवाहात नव्या विचाराने मी काम करतो आहे. आपला आशिर्वाद मला मिळावा.”

यावेळी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत धुसफुस सुरु असल्याच्या आणि अजित पवार पक्षाला टेकओव्हर करत असल्याच्या चर्चेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आहेत.  सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय स्तरावर काम करतात. राज्यस्तरावर संघटनात्मक काम जयंत पाटील आणि सर्वजण मिळून करत आहेत. यात अजित पवारांचाही समावेश आहे. अजित पवार निर्विवाद नेते आहेत यात कोणतीही शंका नाही. मी जोपर्यंत त्या पक्षात होतो तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कोणतीही धुसफुस नव्हती. आजही राष्ट्रवादीत पवारांचाच शब्द अंतिम आहे.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.