चुकीला माफी नाही; याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. यावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर (Shiv sena) टीकेची झोड उठवली. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याकूब मेमन (Yakub Memon) प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटले मुख्यमंत्री?
याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी याविषयावर जास्त बोलणे टाळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शेलारांची टीका
दरम्यान त्यापूर्वी आशिष शेलार यांनी देखील शिवसेनेवर याकूब मेमन प्रकरणात जोरदार टीका केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तर दुसरीकडे या प्रकरणाचा आणि महापालिका तसेच शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.