भाजपचे पाच खासदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी होणार असल्याचं दिसतंय. कारण, भाजपचे पाच विद्यमान खासदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, हे पाच खासदार आघाडीच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही जवळपास निश्चित मानलं जातंय. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार आहेत. पाचही […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी होणार असल्याचं दिसतंय. कारण, भाजपचे पाच विद्यमान खासदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, हे पाच खासदार आघाडीच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही जवळपास निश्चित मानलं जातंय.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार आहेत. पाचही खासदारांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. माढाच्या जागेवर विजयसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळेल. त्यांना सुरुवातीला विरोध झाला होता. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख ही जागा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण विजयसिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. वाचा – माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत पक्षात नाराजीचा सूर होता. पण उदयनराजेंनाही पुन्हा तिकीट मिळणार हे निश्चित झालंय. उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जात असल्याचं चित्र होतं. पण राष्ट्रवादीने नमतं घेत राजेंनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वाचा – सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!
भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे जिंकले होते. इथे 2014 मध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. या जागेवर कुकडे यांनाच उमेदवारी मिळणार आहे. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा खाली झाली होती. वाचा – भंडारा-गोंदिया लोकसभा : भाजपकडे तगड्या उमेदवाराची वाणवा
बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. याशिवाय भाजपचे पाच विद्यमान खासदार आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. हे खासदार नेमके कोण आहेत याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. मात्र येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा – बारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर