गोळ्या घालून ज्यांना संपवलं असे जगातील 5 मोठे नेते आणि त्यांची गोष्ट…

Worlds Greatest Leaders Shot Dead : जगातील पाच मोठ्या नेत्यांची गोळ्या घालून हत्या

गोळ्या घालून ज्यांना संपवलं असे जगातील 5 मोठे नेते आणि त्यांची गोष्ट...
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 4:50 PM

मुंबई : एखादा नेता मोठ्या कष्टातून उभा राहातो. समाजासाठी देशासाठी जगासाठी आणि एकूणच जगाच्या कल्याणासाठी काम करतो. पण अनेकदा त्यांचं हे काम काही लोकांना पटत नाही अन् त्यांच्या जीवनाचा अनपेक्षित अंत होतो. जगातील अनेक नेत्यांचा अतं त्यांच्यावरच्या हल्ल्यातून झाला आहे. काहीवेळा थेट गोळ्या झाडल्या जातात तर कधी बॉम्बस्फोटातून त्यांची हत्या केली जाते.आज जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची हत्या झाली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. नंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पण जगाला नकोशी असणारी बातमी समोर आली. त्यांचं निधन झालं. त्यामुळे हत्या झालेल्या नेत्यांची पुन्हा एकदा चर्चा झाली. महात्मा गांधी (Mahatma Gandhi), मार्टिन ल्युथर ,इंदिरा गांधी ,अब्राहम लिंकन आणि बेनझीर भुट्टो यांचा मृत्यू कसा झाला. याविषयी सविस्तरपणे वाचूयात…

महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी भारताला पडलेलं एक अहिंसावादी आणि सत्याचं स्वप्न… महात्मा गांधी यांनी भारतासह जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला अन् त्या मार्गावर चालण्यास अनेकांना आकर्षित केलं. कुणी महात्मा, कुणी बापू तर कुणी राष्ट्रपिता असं म्हणत त्यांना आपल्या मनात अढळस्थान दिलं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि कायम अहिंसेचा मार्ग आपलासा करणाऱ्या राष्ट्रपित्याचा अंत मात्र रक्ताच्या थारोळ्यात झाला. स्वातंत्र्यानंतर केवळ पाच महिन्यातच त्यांची हत्या झाली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. नथुराम गोडसेने बिर्ला हाऊस येथे संध्याकाळी प्रार्थनेवेळी गांधीजींवर गोळ्या झाडल्या. अन् त्याच दिवशी त्यांचा करुण अंत झाला.

मार्टिन ल्युथर

मेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून जगाला परिचित असणाऱ्या मार्टिन ल्युथर यांनी आजन्म अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यांना महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित केलं. ते कायम अहिंसेच्या मार्गाने आपलं काम करीत. मार्टिन ल्युथर यांनी कृष्णवर्णीयांच्या न्याय हक्कांसाठी चळवळ उभी केली. त्यांनी वॉशिंग्टन येथे अनेक मोर्चे काढले. एक मोर्चा तर इतका विराट होता की, या मोर्टात अडीच लाखांहून अधिक लोक होते. या मोर्चात त्यांनी केलेले ‘आय हॅव अ ड्रीम’ हे भाषण जगप्रसिद्ध ठरले. अमेरिकन समाजाचा जगण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या मार्टिन यांना वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षीच नोबल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘टाइम’ मॅगझिनने त्यांची ‘मॅन ऑफ द इयर’ या सन्मानाकरिता निवड केली होती.

हे सुद्धा वाचा

व्हिएतनाममधील अमेरिकन हस्तक्षेपाला किंग यांनी विरोध केला होता. त्यामुळे अनेक उदारमतवादी गोऱ्यांचा पाठिंबा त्यांनी गमावला होता. अशातच मॅफिसमधील कचरा कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ते तेथे गेले असताना ४ एप्रिल १९६८ रोजी एका गौरवर्णीयाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली, त्यावेळी त्यांचं वय केवळ 39 वर्षे होतं. अन् तिथेच एका अन्यायाच्या कर्दनकाळाचा अंत झाला.

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. पण पुढे त्यांची हत्या झाली. 1984 साली त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.त्यांच्याच सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर हल्ला केला. इंदिरा गांधी या सकाळी आपल्या बागेत फेरफटका मारत असताना त्यांच्या अंगरक्षकांनेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अन् त्यांचा करुण अंत झाला.

अब्राहम लिंकन

अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचीही हत्या करण्यात आली.1865 मध्ये ही घटना घडली. अब्राहम लिंकन हे फोर्ड थिएटर, वॉशिंग्टन येथे अवर अमेरिकन कजिन हे नाटक पाहणयासाठी जात होते. नेमबाज जॉन विक्स बूथ हा व्यावसायिक नाटककार होता. लिंकनचा सुरक्षा रक्षक ‘जॉन पार्कर’ काही वेळातसाठी त्यांना सोडून गेला. रात्री 10.15 वाजता संधी पाहून जॉन विल्क्स बूथने लिंकन यांच्या डोक्यात मागून गोळी झाडली. मेजर हेन्री रॅथबोनने हल्लेखोर वाइक्स बूथला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. लिंकन यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

बेनझीर भुट्टो

पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीही 27 डिसेंबर 2007 रोजी संध्याकाळी हत्या करण्यात आली. रावळपिंडीत त्यांची रॅली सुरू होती. इतक्यात त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. रॅलीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला शिवाय त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 2007 मध्ये त्यांच्या जीवनाचा अंत झाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.