छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून भाजपची ‘एक्झिट’?
छत्तीसगडमध्ये 12 आणि 20नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाचटप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणिराजस्थानमध्ये एकाच टप्प्यात आज मतदान झालं. मतदारांनी उमेदवारांचं भविष्य तरठरवलं आहे, पण सत्तेची चावी कुणाकडे याचा निर्णय 11 तारखेला निश्चित होणार आहे.
मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. पण त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने भाजपची धाकधुक वाढवली आहे. कारण, गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचं पुनरागमन होताना दिसतंय. तेलंगणातही भाजपला फार काही करता आलेलं नाही. तर मिझोरामही भाजपला जिंकता येईल, असं एक्झिट पोलमधून वाटत नाही. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुकात भाजप तीन राज्य गमावत असल्याचं सध्या चित्र आहे. तर एकाही राज्यात नव्याने सत्ता येताना दिसत नाही.
छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाचटप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणिराजस्थानमध्ये एकाच टप्प्यात आज मतदान झालं. मतदारांनी उमेदवारांचं भविष्य तरठरवलं आहे, पण सत्तेची चावी कुणाकडे याचा निर्णय 11 तारखेला निश्चित होणार आहे.
मध्य प्रदेश भाजपच्या हातून जाणार?
एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार मध्यप्रदेशात सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपात कडवी झुंजपाहायला मिळत आहे. आज तक आणि एक्सिस मायच्या पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला104 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 102-120 जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या पोलनुसार, 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्याचं दिसत आहे.भाजपला 126, काँग्रेस 89, बसपा 06 आणि इतरांना 09 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया टुडेच्या पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला 102-120 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशात बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि भाजपात यामुळे काँटे की टक्कर होणार आहे.
जन की बातच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला मध्य प्रदेशात 108 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस 95 ते 115च्या आसपास राहू शकते. म्हणजेच काँग्रेसही बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे.
2013 सालचं चित्र
मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्लामानला जातो. गेल्या पंधरा वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे. 2013 च्या विधानसभानिवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चारआमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हानआहे.
छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत?
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप बहुमतासह सत्तेत येताना दिसत आहे. तर काँग्रेसला 35 जागा मिळत आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत, मात्र सत्ता राखण्यात यश येताना दिसतंय. भाजपला यावेळी 46 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं या पोलमध्ये म्हटलंय.
छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत आणि बहुमतासाठी 46 जागांची गरज आहे. भाजपला बरोबर बहुमताएवढ्याच जागा मिळताना दिसत आहेत. बहुजन समाज पार्टी आणि जनता काँग्रेस यांच्या आघाडीला सात जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
रमण सिंग हे गेल्या पंधरा वर्षांपासून छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. यावर्षीही पक्षाने त्यांच्यावरच विश्वास दाखवला आणि रमण सिंहांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढली. ते सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होत असल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यांमधून दिसत आहे.
आजतकचा एक्झिट पोल
आजतकच्या सर्व्हेनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता जाताना दिसत आहे. काँग्रेस 90 पैकी 55-65 जागांसह पूर्ण बहुमताने सत्तेवर येताना एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय.
न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार,भाजपला 38 ते 42 जागा मिळत आहेत. हा आकडा बहुमतापासून दूर आहे. तर काँग्रेसला 42-44 जागा दाखवण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडमधील 2013 सालची परिस्थिती
मध्य प्रदेशमधून वेगळं झालेलं छत्तीसगड हे राज्य गेल्या 15 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 90 विधानसभासदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या निवडणुकीत 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य टक्कर आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचं कमबॅक?
इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस कमबॅक करताना दिसत आहे.काँग्रेसला 119 ते 141 जागा, भाजपला 55 ते 72 जागा आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचीशक्यता आहे. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतदान झालंय. एकूण 200 विधानसभासदस्यसंख्या असलेल्या राजस्थानमध्ये एका जागेसाठी निवडणूक नंतर होणार आहे.
रिपब्लिक-सीव्होटरच्या पोलनुसार, भाजपला राजस्थानमध्ये 52-68, काँग्रेस 129-145 आणि इतरांना 5-11 जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या एक्झिटपोलनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 85 तर, काँग्रेसला 105 जागा मिळत आहेत. यापोलनुसारही काँग्रेसला बहुमत मिळताना दिसतंय.
2013 सालचं चित्र?
राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्टबहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल.
तेलंगणात टीआरएसला दुसऱ्यांदा संधी?
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्स पोलनुसार, तेलंगणात पुन्हा एकदा चंद्रशेखर राव यांचं सरकार येताना दिसतंय. 120 जागा असलेल्यातेलंगणात चंद्रशेखर राव यांचा पक्ष टीआरएसला 66, भाजपला 7, काँग्रेस 37 आणिइतरांना नऊ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
2014 सालचं चित्र
2014 साली नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने सत्ता मिळवली होती. पण काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत 119सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90,काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवरविजय मिळवला होता.
LIVE UPDATES :
टाइम्स नाऊ – तेलंगणा
टीआरएस – 66 टीडीपी+काँग्रेस – 37 भाजप – 7 इतर – 9
टाइम्स नाऊ – मध्य प्रदेश
भाजप – 126काँग्रेस – 89बसपा – 06इतर – 09एकूण – 231
टाईम्स नाऊ – छत्तीसगड
काँग्रेस – 35 भाजप – 46 बसपा – 7
अन्य – 2
टाइम्स नाऊचा एक्झिट पोल – राजस्थान
भाजप – 85 काँग्रेस – 105 बीएसपी-जेसीसीजे – 02 इतर – 07 एकूण – 199
इंडिया टीव्हीचा एक्झिट पोल – छत्तीसगड
भाजप – 42 ते 50 जागाकाँग्रेस – 32 ते 38 जागाजनता काँग्रेस – 6 ते 8 जागाइतर – 1 ते 3 जागा
आज तकचा एक्झिट पोल – मध्य प्रदेश (230)
काँग्रेस: 104-122
भाजप: 102 – 120
अन्य: 4-11
मिझोराम
40 सदस्यसंख्या असलेल्यामिझोराममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराम हे काँग्रेसच्या हातात असलेलंईशान्येकडील एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचा सध्या या विधानसभेत एकही आमदारनाही.
एक्झिट पोल लाईव्ह