अनिल देशमुखांना मोठा दिलासा, सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर
अनिल देशमुखांना मोठा दिलासा
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh Bail) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीनंतर आता सीबीआय प्रकरणातही (CBI Case) अखेर जामीन मंजूर झालाय. कोर्टाकडून अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय.
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना याआधी जामीन मंजूर मिळाला आहे. आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. न्यायाधीश एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे त्यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आणि अखेर देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. याचदिवशी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
जामीनाला 10 दिवसांची स्थगिती
अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. पण सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकरणी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाला तुर्तास स्थगिती देण्याची विनंती कोर्टासमोर करण्यात आली. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळाला असला तरी जेलबाहेर येण्याचा त्यांचा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.
अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला होता. तसंच आता सीबीआयनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला आहे.
अनिल देशमुख यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
View this post on Instagram
100 कोटी वसुली प्रकरणाचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता. या 100 वसुली प्रकरणात आरोपी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनलाय. देशमुख यांच्या सांगण्यावरून आपण मुंबईतील बारमधून वसूली केल्याचं सचिन वाझे याने सीबीआय आणि ईडीला दिला होता. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या. पण आता काही अटी शर्थींसह मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन दिला आहे.