माजी मुख्यमंत्र्याकडून राहुल गांधींचा ‘अमूल बेबी’ उल्लेख

नवी दिल्ली : सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतनंदन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांचा अमूल बेबी असा उल्लेख केलाय. राहुल गांधींनी केरळमधील वायानाड मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर अच्युतनंदन यांनी हा प्रहार केला. 2011 मध्येही अच्युतनंदन यांनी असंच वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. अच्युतनंदन यांनी फेसबुक पोस्ट […]

माजी मुख्यमंत्र्याकडून राहुल गांधींचा 'अमूल बेबी' उल्लेख
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नवी दिल्ली : सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतनंदन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांचा अमूल बेबी असा उल्लेख केलाय. राहुल गांधींनी केरळमधील वायानाड मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर अच्युतनंदन यांनी हा प्रहार केला. 2011 मध्येही अच्युतनंदन यांनी असंच वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं होतं.

अच्युतनंदन यांनी फेसबुक पोस्ट लिहून राहुल गांधींवर टीका केली आहे. वायानाडमधून लढण्याचा निर्णय हा राहुल गांधींची राजकीय अपरिपक्वता दाखवतो. राहुल गांधी वायानाडमधून लढल्यामुळे डावे पक्ष विरुद्ध राहुल आणि भाजप अशी लढत होईल. पण राहुल गांधींचा समज आहे की इथे काँग्रेस-भाजप लढत असेल. राहुल गांधींच्या या अपरिपक्वतेमुळेच मी त्यांना अमूल बेबी म्हणालो, असं अच्युतनंदन म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी सीपीआयएमचं मुखपत्र असलेल्या ‘देशाभीमानी’मधून राहुल गांधींना पप्पू स्ट्राईक म्हणत टीका करण्यात आली होती. त्यांच्या वायानाडमधून लढण्याच्या निर्णयाला पप्पू स्ट्राईक असं नाव देण्यात आलं होतं. राहुल गांधी त्यांचा नियमित मतदारसंघ अमेठीसह वायानाडमधूनही लढणार आहेत. इथे थेट भाजपशी टक्कर होईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. पण इथे सीपीएमशी खरी लढत असेल असं डाव्या पक्षांचं म्हणणं आहे.

राहुल गांधींचा डाव्यांविरोधात लढण्याचा निर्णय सीपीआयएमला पटलेला नाही. कारण, केरळ वगळता इतर राज्यांमध्ये काँग्रेस आणि सीपीआयएमची आघाडी आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही वायानाडमधून राहुल गांधींविरोधात स्थानिक पक्षाच्या प्रमुखालाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आता विजयाची समीकरणे जुळवणंही सुरु झालंय.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.