हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी लिहिलेल्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमंत्रण देण्यासाठी पाटील कुंटुबासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याचं सांगण्यात आलंय.

हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 10:10 PM

मुंबई : काँग्रेस नेत्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेलं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सहकुटुंब भेट घेतली. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी लिहिलेल्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमंत्रण देण्यासाठी पाटील कुंटुबासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याचं सांगण्यात आलंय.

इंदापूरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. सध्या या जागेवर राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला महत्त्व आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. अंकिता पाटील यांना नुकताच जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय मिळवलाय. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य होत्या. पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी अंकिता पाटील यांना संधी देण्यात आली.

काय आहे इंदापूरच्या जागेचा वाद?

2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढवली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. मात्र आता यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत लोकसभेसह विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत याबाबत एकमत झालं होतं. त्यामुळं इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच राहणार की काँग्रेसला दिली जाणार याबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी केली जाते आणि विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीकडून घात केला जातो, असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटतोय.

पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

अंकिता यांच्या रुपाने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. हर्धवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.