‘बिजली मल्ल’ काळाच्या पडद्याआड, भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन

एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावण्याची खासीयत असल्यामुळे संभाजी पवार हे 'बिजली मल्ल' म्हणून प्रसिद्ध झाले (Sangli Bijali Malla Sambhaji Pawar )

'बिजली मल्ल' काळाच्या पडद्याआड, भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन
भाजप नेते संभाजी पवार
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 8:56 AM

सांगली : ‘बिजलीमल्ल’ अशी ख्याती असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन झाले. संभाजी पवार हे सांगलीचे माजी आमदार होते. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरु होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे ‘बिजली मल्ल’ संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. (Former MLA Sangli BJP Leader Bijali Malla Sambhaji Pawar dies)

‘बिजली मल्ल’ नाव कसे पडले?

‘वज्रदेही मल्ल’ हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावण्याची त्यांची खासीयत असल्यामुळे ‘बिजली मल्ल’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले.

वसंतरावांच्या पुतण्याला हरवून जाएंट किलर

स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करुन संभाजी पवारांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपप्रवेश

संभाजी पवार यांनी 2009 मध्ये भाजपचा झेंडा हाती धरला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत होते.

राजकारणातून निवृत्ती

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर संभाजी पवार सक्रिय राजकारणातून दूर झाले होते. त्यानंतर संभाजी पवार यांनी अधिक वेळ प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी दिला होता. राजकारणापासून दूर गेल्यानंतरही कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडलेली होती. मारुती चौकात नियमित येऊन ते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेशी गप्पा मारत असत. त्यांच्या समस्या सोडवण्याची सूचना करत असत. (Former MLA Sangli BJP Leader Bijali Malla Sambhaji Pawar dies)

कोरोनावर मात

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांना सक्तीने घरी थांबण्याचा सल्ला कुटुंबियांनी दिला होता. त्यानुसार ते घरीच होते. मात्र गेल्या वर्षी  ऑगस्ट महिन्यात पार्किन्सवर उपचारासाठी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच वेळी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. संभाजी पवारांनी कोरोनावर हिमतीने मात केली होती.

संभाजी पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. दुपारी 12 वाजता संभाजी पवारांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. तर 1 वाजता मारुती चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील.

संबंधित बातम्या :

29 व्या वर्षी अपक्ष लढून विधानसभेवर, सांगलीतील माजी आमदार कालवश

सहकाऱ्याच्या निधनाने जयंत पाटील गहिवरले, आठवणी जागवतानाच अश्रू अनावर

(Former MLA Sangli BJP Leader Bijali Malla Sambhaji Pawar dies)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.