शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदाराची उडी, ते म्हणतात, अमोल कोल्हे यांना माझा विरोध नाही पण…
२०१९ पासूनच मी आगामी लोकसभेची तयारी करत होतो. आगामी लोकसभेला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही.
रणजित जाधव, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघात पुढचा लोकसभेसाठी उमेदवार कोण याबद्दल चर्चा सुरू आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघात काही पोस्टर्स लागले आहेत. सध्या अमोल कोल्हे हे या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. कोल्हे यांच्या विरोधात भोसरीचे माजी आमदार यांनी दंड थोपाटल्याचे दिसत आहे. विलास लांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त काही बॅनर्स लागले. या बॅनर्सवर भावी खासदार असं लिहिण्यात आलं. त्या बॅनरवर संसदेचा फोटोही पाहायला मिळतो.
जो कोणी उमेदवार असेल…
सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका आहे, असं मत भोसलीचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केलं. शेवटी पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी द्यायची ते ठरवतील. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल, असंही लांडे यांनी म्हंटलं.
…तर माझा विरोध नाही
विलास लांडे म्हणाले, २०१९ पासूनच मी आगामी लोकसभेची तयारी करत होतो. आगामी लोकसभेला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही. खासदार म्हणून त्यांनी अनेक चांगली काम केलेले आहेत. ते चांगले कार्यकर्ते आहेत. विरोधाला विरोध करण्यापेक्षा चर्चा करावी. ते उभे राहत असतील तर माझा त्यांना विरोध नाही, असंही लांडे यांनी स्पष्ट केलं.
विलास लांडगे यांना निवडून येण्याचा विश्वास
परंतु, मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शंभर टक्के निवडून येईन, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विलास लांडे हे आता भावी खासदार झाले आहेत. शेवटी तिकीट कुणाला द्यायची. हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्यानंतर उमेदवार फायनल होतील. पण, विलास लांडे यांनी इच्छा व्यक्त करून आपण लोकसभेचे भावी उमेदवार असल्याचे दाखवून दिले.