Thane : आमदारांना ‘परत या’ ची हाक अन् कार्यकर्त्यांची ‘हकालपट्टी’, नरेश म्हस्केंचा थेट पक्षप्रमुखांनाच सवाल

आतापर्यंत पक्ष वाढवण्यासाठी सर्वकाही केले होते. जिल्ह्यातील सर्व भाग हा पिंजून गल्लीबोळात शिवसैनिक उभारण्याचे काम जिल्ह्यात झाले होते. वेळप्रसंगी मार खाल्ला, गुन्हेही दाखल झाले हे केवळ पक्षनिष्ठा आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासायचे म्हणून. असे असताना शेवटी काय तर हकालपट्टी, पक्षातून माझी हकालपट्टी केली तरी मनात शिवसेनेबद्दल असलेली निष्ठा कशी कमी होणार? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला.

Thane : आमदारांना 'परत या' ची हाक अन् कार्यकर्त्यांची 'हकालपट्टी', नरेश म्हस्केंचा थेट पक्षप्रमुखांनाच सवाल
नरेश म्हस्के, माजी महापौर ठाणे
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 4:18 PM

ठाणे : आमदार, खासदार, पदाधिकारी बरोबर आता कार्यकर्तेही (Shivsena) शिवसेनेपासून दूर जात आहेत. पक्षातून बंड करणारा प्रत्येकजण एक ना अनेक कारणे सांगत असला तरी ठाण्याचे माजी महापौर (Naresh Mhaske) नरेश म्हात्रे यांनी मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच नाव न घेता सवाल उपस्थित केले आहे. शिवाय आपली हकालपट्टी होण्याअगोदरच एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगोदर (Thane Mayor) ठाणे महापौर पदाचा राजीनामा आणि नंतर कारवाई झाली आहे. हकालपट्टी करणे सोपे असले तरी कार्यकर्त्यांचे संघटन आणि तळागळात जनसेवा ही वेगळी असते. आमदार पक्ष सोडून गेले तर त्यांना ‘परत या’ची हाक ही केवळ सत्तेसाठी होती. तर ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन केले त्यांना अशी ही वागणूक दिल्याचा आरोप ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. हा केवळ सत्तेसाठी खेळ असल्याचे म्हणत आपण शिंदे गटात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सर्वकाही पक्षासाठी अन् पदरी काय?

आतापर्यंत पक्ष वाढवण्यासाठी सर्वकाही केले होते. जिल्ह्यातील सर्व भाग हा पिंजून गल्लीबोळात शिवसैनिक उभारण्याचे काम जिल्ह्यात झाले होते. वेळप्रसंगी मार खाल्ला, गुन्हेही दाखल झाले हे केवळ पक्षनिष्ठा आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासायचे म्हणून. असे असताना शेवटी काय तर हकालपट्टी, पक्षातून माझी हकालपट्टी केली तरी मनात शिवसेनेबद्दल असलेली निष्ठा कशी कमी होणार? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला. एवढेच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम जोपासण्यासाठी शिंदे गटात सहभागी होत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

आमदार अन् पदाधिकाऱ्यांमध्ये दुजाभाव का?

शिवसेना पक्षातून 40 आमदारांनी बंड केले आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना परत बोलावले जात आहेत आणि जे काम करीत आहेत त्यांची हकालपट्टी, हा कसला न्याय. त्यामुळे पक्ष संघटनेपेक्षा प्रमुखांना सत्तेचेच पडले आहे. ज्या आमदारांना मी समर्थन दिले म्हणून माझी हकालपट्टी ते आमदारांची तुम्ही का नाही हकालपट्टी केली आमदारांना दूत पाठवून परत या म्हणतात आणि कार्यकर्त्यांची हकीलपट्टी करतात? तुम्हाला केवळ सत्ता पाहिजे त्या आमदार पाहिजे तुम्हाला कार्यकर्ता ची गरज नाही हे दिसून येत आहे. असा सावलही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांचीच भूमिका योग्य

पक्षाचे संघटन आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घेतलेला निर्णय बरोबर आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून त्रास होत असतानाही आपण मागे हटलो नाही. पण ज्यांच्या विरोधात लढलो आता त्यांच्याच मांडीला-मांडी लावून बसणे योग्य नाही. यामधून ना हिंदुत्वाचा मुद्दा टिकून राहणार आहे ना पक्षाचा स्वाभिमान असे म्हणत माजी महापौर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वावर म्हस्के सवाल उपस्थित केले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.