काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत. नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल […]

काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 5:33 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत.

नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी राजीनामा राहुल गांधींना पाठवलाय. जाखड यांचा स्वतःचाच सनी देओलविरुद्ध गुरदासपूरमधून पराभव झालाय. तर अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झालाय.

मी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण

यापूर्वी यूपीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि ओदिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिलाय. काँग्रेससाठी सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक जिंकूनही लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं.

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

सुनील जाखड यांचा भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमधून पराभव केला. काँग्रेसने पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. अकाली दल आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर आपने एक जागा जिंकली. सुनील जाखड यांनी भावूक पत्र लिहिलंय. काँग्रेस अध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मला पाठिंबा दिला. तरीही मी जागा वाचवू शकलो नाही. त्यामुळे या पदावर राहणं माझ्यासाठी शक्य नाही, असं जाखड यांनी म्हटलंय.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.