अयोध्येत गेल्यावर रवी राणा यांनी वर्तवलं उद्धव ठाकरे यांचं भाकीत, ‘तर ते लवकरच मेंटल…’
उद्धव ठाकरे आता हद्दपार झाले आहेत. ज्या दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच ते हद्दपार झालेले. आता थोडे दिवस उरलेले आहेत.
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच अयोध्येत पोहोचतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे सर्वच नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. तर अपक्ष आमदार रवी राणा हे ही आपल्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासह अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येणार आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि अनेक आमचे आमदार सहकारी अयोध्येला येणार आहेत. इथे आम्ही सगळे मिळून मोठी रॅली काढणार आहे असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आता हद्दपार झाले आहेत. ज्या दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच ते हद्दपार झालेले. आता थोडे दिवस उरलेले आहेत. काही दिवसांनी तुम्हाला उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये जाऊन एखाद्या पदावर जाऊन बसलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला आमदार राणा यांनी लगावला.
खासदार संजय राऊत म्हणतात नवनीत राणा कोण हे मला माहित नाही. ज्या संसदेत तुम्ही जात त्याच संसदेच्या नवनीत राणा या खासदार आहेत. ते नेहमी झोपेच्या गोळ्या घेऊन बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे इतके लक्ष देण्याची गरज नाही.
राज्यसभेसाठी आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही तिथे पोहोचला. आम्ही आमदारांनी मतदान केले म्हणून राज्यसभेमध्ये गेले. तुम्ही कधी जमिनीवरची निवडणूक लढविली आहे का ? कधी जमिनीवरची निवडणूक लढा. एखादा रस्त्यावर चालणारा कार्यकर्ता तुमच्या विरोधात मैदानात उतरला तर तो निवडून येईल आणि संजय राऊत यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत जे काही बेताल वक्तव्य करतात ते फक्त उद्धव ठाकरेला आवदेल यासाठीच बोलतात. बाकी कोणालाही त्यांच्या बेताल वाक्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना आज खऱ्या अर्थाने चांगल्या मानसोपचार डॉक्टरची गरज आहे. ते मेंटल झाले असून त्यांना चांगल्या औषधांची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापासून जरा दूर रहावे नाही तर थोड्या दिवसात त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे मेंटल होऊन जाईल, असा टोलाही आमदार राणा यांनी लगावला.