एकनाथ खडसेंचं राजकीय पुनर्वसन; खडसेंना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी

पक्षबदलानंतर खडसेंच्या पदरी नेमकं काय पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

एकनाथ खडसेंचं राजकीय पुनर्वसन; खडसेंना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 7:37 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. पक्षबदलानंतर खडसेंच्या पदरी नेमकं काय पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झाली आहेत. (from NCP Eknath Khadse appointed in Legislative Council)

विधानपरिषदेत राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून लागली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून दिली जाणारी प्रस्तावित 12 आमदारांची नावं समोर आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळाली आहे. त्यांचं नाव जवळपास निश्चिच झाल्याचं समजतंय

खडसेंना संधी दिल्यानंतर राष्ट्रवादीला काय फायदा ?

खडसे हे ओबीसी समाजातून आलेले आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्याशिवाय खडसे यांचं उत्तर महाराष्ट्रातही मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी काळात खडसेंच्या साथीने सहकारी बँकांपासून ते पालिका आणि नगरपरिषदेतील भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यावरही राष्ट्रवादीचा भर असणार आहे. खडसेंना विधान परिषदेत आणल्यास विरोधी पक्षाला नामोहरम करण्यास फायदाच होणार असल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना आमदारकी देऊ नये, अशी विनंती केली होती. खडसेंची विधान परिषदेवर वर्णी लागू नये म्हणून त्यांनी राज्यपालांची देखील भेट घेतली होती. त्यांनतर आता राष्ट्रवादीकडून खडसे यांना विधानपरिषदेसाठी आमदारकी दिली जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?

राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

(from NCP Eknath Khadse appointed in Legislative Council)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.