मोदींपासून ममतांपर्यंत ‘या’ 5 नेत्यांचे 23 मे रोजीचे भविष्य
नवी दिल्ली : मतमोजणीचा दिवस कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांचे पुढील राजकीय भविष्य निकालाच्या दिवशीच ठरणार आहे. या दिवसाबाबत ज्योतिषांनीही भविष्य वर्तवले आहे. नरेंद्र मोदी : भाजपचे सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदींसाठी 23 मे हा दिवस भाग्याचा असणार […]
नवी दिल्ली : मतमोजणीचा दिवस कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांचे पुढील राजकीय भविष्य निकालाच्या दिवशीच ठरणार आहे. या दिवसाबाबत ज्योतिषांनीही भविष्य वर्तवले आहे.
नरेंद्र मोदी :
भाजपचे सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदींसाठी 23 मे हा दिवस भाग्याचा असणार आहे. मोदींच्या कुंडलीत बृहस्पतींचा गुरुवार आहे. त्यामुळे या दिवशी त्यांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. दुपारपर्यंत त्यांच्या बाजूने चांगला निकाल दिसेल, मात्र त्यानंतर स्थिती काहीशी कमकुवत होईल. कारण त्यावेळी चंद्र त्यांच्या मकर राशीत असेल.
राहुल गांधी :
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या राशीत मतमोजणीचा प्रारंभ चांगला आहे. त्यांच्या जन्मराशीतही मतमोजणी फायद्याची आहे. मात्र, 23 अंक त्यांच्यासाठी विशेष प्रभावी नसल्याने सुरुवातीचे परिणाम त्यांच्यासाठी थोडे कमकुवत असतील. सायंकाळी परिस्थिती अधिक सकारात्मक असेल. मतमोजणी 24 मे पर्यंत सुरु राहिल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण 6 हा अंक त्यांचा भाग्यांक आहे.
ममता बॅनर्जी आणि मायावती :
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची नावाप्रमाणे रास सिंह आहे. सुर्याची ही रास त्या दोघींनाही राजकारणात प्रभावी बनवते. मतमोजणीच्या दिवशी धुन-मकरचा चंद्र त्यांच्या राशीत पाचवा आणि सहावा राहिल. ही स्थिती विरोधीपक्षांच्या तुलनेत अधिक चांगली आहे. या दोन्ही नेत्यांचे भाग्य त्यांच्या पक्षांसाठीही फायद्याचे राहिल.
अमित शाह, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश :
अमित शाह, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यांची नावाप्रमाणे मेष रास आहे. त्यांच्या राशीत चंद्र असून त्याचा त्यांना फायदा होईल. या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वात त्यांचा पक्ष चांगले काम करेल. मात्र, चंद्रासोबत त्यांच्या राशीत शनि आणि केतुचाही प्रवेश त्यांना नुकसान करणारे ठरेल. गुरुची आठव्या स्थावरील स्थितीही त्यांना कमकुवत करेल. या तिन्ही नेत्यांना अपेक्षित निकाल मिळायला कदाचित यश मिळेल.
भारत:
भारत आणि भारतातील नागरिकांसाठी मतमोजणीचा दिवस प्रभावी असेल. धनुच्या चंद्रामुळे शनिसोबतचा संयोग सामान्य माणसांसाठी फायद्याचा राहिल. मात्र, जनतेची मनस्थिती स्पष्ट बहुमत देणारी दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असेच म्हणावे लागेल.