मातोश्रीवर गौतम अदानी-उद्धव ठाकरे तासभर चर्चा, चर्चेनंतर तर्कवितर्क सुरु
एकीकडे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रोजेक्टसाठी परराज्यात जाहिराती दिल्याचा आरोप केलाय, तर तिकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि उद्योजक गौतम अदानी यांची भेट झाली.
मोहन देशमुख, टीव्ही ९, मुंबई : मातोश्रीवर आज दुपारी उद्योजक गौतम अदानी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट झाली. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. Uddhav Thackeray मातोश्रीवरील ही चर्चा कोणत्या विषयावर होती, हे अजून समजू शकलेलं नाही. गौतम अदानी हे जेव्हा केंद्र सरकारचे जवळचे उद्योजक आहेत, असे आरोप होतात, तेव्हा भाजपाच्या विरोधीपक्षातील नेत्यांना Gautam Adani गौतम अदानी भेटीला का गेले असावेत हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही भेट अशावेळी झाली, जेव्हा आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वी वर्सोवा सी लिंकवरुन राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून कसं दूर लोटलं जात आहे, असे आरोप करत होते.
वर्सोवा वरळी सी लिंकची जाहिरात चेन्नईत केली जात आहे, पण महाराष्ट्रात का नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे या भेटीविषयी काही बोलतील का?
पण दुसरीकडे आज उद्धव ठाकरे हे देखील गोरेगावात शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.या आधी त्यांच्यात आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यात काय चर्चा झाली, यावर ते आपल्या भाषणात बोलतील का हा देखील प्रश्न आहे.
मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटनेत्यांची आज बैठक आहे, गटनेत्यांकडून शपथपत्र घेतले जात आहेत, यासाठी काऊंटर देखील लावण्यात आलेले आहेत.
मुंबईतल्या नेस्को मैदानात दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून दुसरीकडे दसरा मेळावा हा शिवाजीपार्कवरच कसा होईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.