गौतम गंभीरही ‘चौकीदार’ बनला, दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार गंभीरची संपत्ती किती?

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे. दिल्लीत क्रिकेटर, बॉक्सर, अभिनेता आणि नेता सर्वजण निवडणुकीत उतरले आहेत. सर्वांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. इथे भाजपकडून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरही मैदानात आहे. या सर्व उमेदवारांमध्ये गौतम गंभीर सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. गौतम गंभीरची संपत्ती तब्बल 147 कोटी रुपये आहे. गंभीरनेही आता ट्विटरवर […]

गौतम गंभीरही 'चौकीदार' बनला, दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार गंभीरची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे. दिल्लीत क्रिकेटर, बॉक्सर, अभिनेता आणि नेता सर्वजण निवडणुकीत उतरले आहेत. सर्वांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. इथे भाजपकडून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरही मैदानात आहे. या सर्व उमेदवारांमध्ये गौतम गंभीर सर्वात श्रीमंत उमेदवार आहे.

गौतम गंभीरची संपत्ती तब्बल 147 कोटी रुपये आहे. गंभीरनेही आता ट्विटरवर आपल्या नावापुढे भाजप नेत्यांप्रमाणे चौकीदार लिहिलं आहे.

गौतम गंभीर काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये सहभागी झाला. त्याला भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्याने बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला.

क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेला गौतम गंभीर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहे. गंभीरने उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार गंभीरने 2017-18 मध्ये भरलेल्या आयटी रिटर्ननुसार 12.40 कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवलं. त्याची पत्नी नताशाने 6.15 लाख रुपये उत्पन्न दर्शवलं आहे. गंभीरने जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून 147 कोटीची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.

 कोणाला कुठून उमेदवारी?

काँग्रेसचे उमेदवार – पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, चांदनी चौकातून जयप्रकाश अग्रवाल, नवी दिल्लीतून अजय माकन, उत्तर पश्चिम दिल्ली राजेश लिलोठिया, पश्चिम दिल्ली महाबल मिश्रा, उत्तर पूर्व दिल्ली शीला दीक्षित आणि दक्षिण दिल्लीतून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 भाजपचे उमेदवार –

उत्तर पश्चिम दिल्ली – पंजाबी गायक हंसराज हंस

दक्षिण दिल्ली – विद्यमान खासदार रमेश बिधुडी

नवी दिल्ली – विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी

पूर्व दिल्ली – गौतम गंभीर

चांदनी चौक – केंद्रीय मंत्री हर्षवर्धन,

पश्चिम दिल्ली – प्रवेश वर्मा

उत्तर पूर्व दिल्ली – भाजपा प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी

आप – चांदनी चौक – पंकज गुप्ता,

उत्तर पूर्व दिल्ली – दिलीप पांडेय,

पूर्व दिल्ली – आतिशी

दक्षिणी दिल्ली – राघव चड्ढा,

उत्तर पश्चिम दिल्ली – गूगन सिंह,

नई दिल्ली – ब्रजेश गोयल,

पश्चिमी दिल्ली – बलवीर सिंह जाखड

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.