गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात, दिल्लीतून लढणार निवडणूक
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहे. त्यात नुकतंच भाजपने दिल्ली लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात भारताच्या माजी सलामीवीर गौतम गंभीर यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पूर्वी दिल्ली से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी श्री @GautamGambhir को मैं अपनी शुभकामनाएं अर्पित करता हूँ। मुझे […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहे. त्यात नुकतंच भाजपने दिल्ली लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात भारताच्या माजी सलामीवीर गौतम गंभीर यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
पूर्वी दिल्ली से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी श्री @GautamGambhir को मैं अपनी शुभकामनाएं अर्पित करता हूँ। मुझे पूरी आशा है कि उनके नेतृत्व में हम पुनः पूर्वी दिल्ली से विजय प्राप्त करेंगे और श्री @narendramodi जी को प्रधानमंत्री बनाने में योगदान देंगे।
— Chowkidar Maheish Girri (@MaheishGirri) April 22, 2019
काही महिन्यांपूर्वी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर 22 मार्च रोजी गौतम गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर अनेकांनी ते दिल्लीतून निवडणूक लढतील असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरला तर मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पूर्व दिल्लीतून भाजपचे विद्यमान खासदार महेश गिरी यांचे तिकीट मात्र कापण्यात आले आहे.
Many thanks sir, will need your guidance and support. https://t.co/RGxZ2QFYST
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 22, 2019
क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणारा गौतम गंभीर आता लवकरच राजकीय मैदानात फलदांजी करण्यास उतरणार आहे. त्यांचा सामना काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली आणि आम आदमी पार्टीचे नेते आतिशी मार्लेन यांच्यासोबत होणार आहे. येत्या 12 मे रोजी दिल्लीतील 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.