Gulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडण्यामागची 5 कारणं ‘ही’ आहेत!
Gulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेस का सोडली ? याची पाच कारणं जाणून घ्या..
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad resignation) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामागची कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. पक्षाच्या धोरणांबद्दल ते बर्याच दिवसांपासून नाराज होते आणि काँग्रेसनं त्यांना जम्मूमध्ये जबाबदारी दिली होती त्या पक्षाचा त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. आता त्यांनी सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले आहे. ते पत्रात लिहितात की, “अत्यंत खेदानं आणि अंतः करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे,” असं गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. आझाद यांनी काँग्रेस का सोडलं ? याची पाच कारणं जाणून घ्या..
आझाद यांनी सोनिया गांधींना दिलेलं पत्र
“It is therefore with great regret and an extremely leaden heart that I have decided to sever my half a century old assocation with Indian National Congress,” read Ghulam Nabi Azad’s resignation letter to Congress interim president Sonia Gandhi pic.twitter.com/X49Epvo1TP
— ANI (@ANI) August 26, 2022
हे सुद्धा वाचा
काँग्रेस सोडण्याची काही कारणं….
- गुलाम नबी आझाद यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती, असं सांगितलं जातं. आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं जावं, अशी त्यांची इच्छा होती. गुलाम नबी आझाद राज्यातील सगळ्यात मोठा नेता होण्याचं आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असण्याची आशा बाळगून होते. त्यांच्या समर्थकांनाही त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जावी, अशी मागणी जोर धरत होते.
- तारीख हमी कर्रा यांसारख्या एका वादग्रस्त नेत्याच्या खाली एका कमिटीत त्यांना ठेवलं गेलं होतं. ही बाब कुठेतरी गुलाम नबी आझाद यांना खटकत होती. त्यामुळे ते अनेक दिवस अस्वस्थ होते. त्याची नाराजीही त्यांनी अनेकदा उघड केली होती.
- काँग्रेस कार्यकारीणीत सदस्य असलेल्या गुलाम नबी आझाद यांना राज्यातीलही कमिटीत ठेवण्यात आलं होतं. असं केल्यानं आपली राष्ट्रीय पातळीवरील ताकद कमी होते, अशी भावना तयार झाली होते, असंही त्यांना वाटत होतं. सोनिया गांधी यांना सल्ला देणाऱ्या पॉलिटिकल अफेअर्सच्या कमिटीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुलाम नबी आझाद यांच्या नाराजीचं हे देखील एक मोठं कारण होतं.
- काँग्रेस कमिटीतील इतर सदस्यांच्या निवडीबाबत गुलम नबी आझाद यांचं मत काय आहे, याबाबत त्यांना वाचरणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्य पातळीवर अनेक नेते नाराज होते.
- गुलाम नबी आझाद यांना कॅम्पेन कमेटीचं अध्यक्ष करण्याची घोषणा होण्याआधी महासचिव वेणुगोपाल यांनी वरिष्ठ नेत्यांना सूचिक करण्याच्या परंपरेकडे लक्ष नव्हतं दिलं. त्यामुळे या गोष्टी बाहेर येऊ शकल्या नसत्या, अशी दाट शक्यता होती.