जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले… अहो ते तर पुण्याचे भिडे : गिरीश बापट
भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेकरांचे किस्से सांगत जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेकरांचे किस्से सांगत जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून तर अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक किस्से सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. ते संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते पुरस्कार वितरण झालं (Girish Bapat sarcasm on Punekar and various claim of Pune Connection).
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना गिरीश बापट म्हणाले, “जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले, मात्र पुण्याचा एकजण म्हटला बायडन हे तर पूर्वीचे भिडे, ते पुण्यातच होते. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्याही पुण्यात हुजूरपागा शाळेत शिकायला होत्या. काहीही करा, पुण्याचा संबंध लावला जातो.”
“देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही आम्ही असंच म्हणतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांचे काका पुण्यात होते, ते येत होते. म्हणून ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे पुणेकर हुशार आहेत, सगळं करून पुन्हा पुण्याशी नातं येतं,” असंही गिरीश बापट यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
girish bapat ! बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; गिरीश बापट म्हणतात…
शिवसेना-काँग्रेसमध्ये दम नाही, राष्ट्रवादीचा उमेदवार बंडखोर, गिरीश बापटांचा हल्लाबोल
पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही : गिरीश बापट
संबंधित व्हिडीओ पाहा :
Girish Bapat sarcasm on Punekar and various claim of Pune Connection