शिवसेना-काँग्रेसमध्ये दम नाही, राष्ट्रवादीचा उमेदवार बंडखोर, गिरीश बापटांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीने पुणे मतदारसंघातून बंडखोर उमेदवाराला तिकीट दिल्याचा फायदा भाजपला होईल, असं गिरीश बापट म्हणाले.
नवी दिल्ली : “शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दम नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोर उमेदवाराला तिकीट दिलं आहे. याचा फायदा भाजपला होईल. विधानपरिषदेवरील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल” असा विश्वास पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. (Girish Bapat slams Maha Vikas Aghadi claims BJP will win Pune Graduate Constituency Election)
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे निवडणूक नियोजन चांगले आहे. राष्ट्रवादीने पुणे मतदारसंघातून बंडखोर उमेदवाराला तिकीट दिल्याचा फायदा भाजपला होईल, असं बापट म्हणाले.
भाजपने अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे मतदार नोंदणी केल्याने याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मतदार नोंदणी केलेले हजारो अर्ज बाद झाल्याचा फटकाही भाजपला बसू शकतो, अस राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, वीज बिलासाठी राज्य सरकारने कर्ज काढावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला मदत करावी अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं.
“काँग्रेस मंत्र्यांची खंत”
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना फंड मिळतो, पण काँग्रेसला फंड मिळत नाही अशी खंतही काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. (Girish Bapat slams Maha Vikas Aghadi claims BJP will win Pune Graduate Constituency Election)
मुंबईची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप आले आणि गेलेही; अनिल परबांनी फडणवीसांना डिवचले https://t.co/TfrYyzabGS @advanilparab @Dev_Fadnavis #BJP #Shivsena #BMC #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
संबंधित बातम्या :
पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत
पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत
(Girish Bapat slams Maha Vikas Aghadi claims BJP will win Pune Graduate Constituency Election)