Girish Mahajan : संजय राऊतांनी पवित्र असल्याचे पुरावे द्यावेत, त्यांना कोणीही अटक करणार नाही; गिरीश महाजन यांचा टोला

Girish Mahajan : आपली चोरी पकडली गेली म्हणजे तो मुंबईचा, महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय, असं भावनिक आवाहन करून आता लोक फसणार नाहीत. लोकांनाही कळतंय कोणत्या प्रकरणात काय काय सुरू आहे. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय.

Girish Mahajan : संजय राऊतांनी पवित्र असल्याचे पुरावे द्यावेत, त्यांना कोणीही अटक करणार नाही; गिरीश महाजन यांचा टोला
संजय राऊतांनी पवित्र असल्याचे पुरावे द्यावेत, त्यांना कोणीही अटक करणार नाही; गिरीश महाजन यांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 12:27 PM

जळगाव: संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर तत्काळ कारवाई झालेली नाही. तक्रार आली आणि कारवाई झाली असंही झालेलं नाही. पत्राचाळ प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती, त्यांना अनेकदा समन्स आले. चौकशीला बोलावलं. पण त्यांनी सहकार्य केले नाही. म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी (ED) सहजासहजी अशी कारवाई करत नाही किंवा अटक करत नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनाही संधी देण्यात आली होती. तशीच संधी संजय राऊतांनाही दिली गेली. पण त्यांनी टाळाटाळ केली. ईडीनं सखोल चौकशी करूनच त्यांना अटक केली, असं सांगतानाच संजय राऊत यांनी आता योग्य ती कागदपत्रे सादर करावीत. आपल्या पवित्रतेचे पुरावे द्यावेत. मग त्यांना कुणीही अटक करू शकणार नाही, असा टोला भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. विरोधकांना असं बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर समजा ईडीनं सूडबुद्धीने कारवाई केली तर मग न्यायालयाने देखील नवाब मलिक, अनिल देशमुख यांना दिलासा का दिला नाही?, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

आपली चोरी पकडली गेली म्हणजे तो मुंबईचा, महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय, असं भावनिक आवाहन करून आता लोक फसणार नाहीत. लोकांनाही कळतंय कोणत्या प्रकरणात काय काय सुरू आहे. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाहीये. स्वतःला तुम्ही काय समजता? जरा अंतर्मुख होऊन विचार करा. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी या निर्णयामुळे सुटकेचा निःश्वास सोडलाय. राऊत यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणून ईडीनं त्यांना अटक केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाची बाजू अगदी स्वच्छ आहे

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या याचिकेवरही भाष्य केलं. धनुष्यबाण नेमका शिंदे गटाचा की उद्धव ठाकरे गटाचा? पक्ष प्रमुख कोण? याची वाट आम्ही पण पाहतोय. ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण मला असं वाटतं की यात शिंदे गटाची बाजू अगदी स्वच्छ आहे. विधानसभेत 166 मतं शिंदे गटाला मिळालेली आहेत. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. हे सर्व इन कॅमेरा झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये काही वेगळा निर्णय होईल, असं मला कुठेही दिसत नाही. पण शिंदे गटाला यात न्याय मिळेल, असं दिसतंय, असंही ते म्हणाले.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.