मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मीही ऐकतोय, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान; आणखी काय म्हणाले?

याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही शक्य नसतं. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी केलं.

मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मीही ऐकतोय, भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान; आणखी काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 11:38 AM

नाशिक: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (milind narvekar) हे नाराज असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी तर मधल्या काळात या चर्चांना हवा देण्याचं कामही केलं. त्यातच भाजपचे नेते अमित शाह (amit shah) यांचे चिरंजीव जय शाह यांना नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता अमित शाह यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी मोठं विधान केलं आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मी ऐकतोय, असं विधान गिरीश महाजन केलं आहे. त्यामुळे नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद नार्वेकर यांनी शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत गिरीश महाजन यांना मीडियाने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नार्वेकर यांच्या नाराजीवरच बोट ठेवलं आहे. नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधानही गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रं आले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही शक्य नसतं. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत यावेळी भाजची सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र महापालिका लढणार आहे. मात्र मनसेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सारवासारवही त्यांनी केली.

छगन भुजबळ पालकमंत्री असतानाच नाशिकचा टोल बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. खड्ड्यांमुळे मला देखील आज ट्रेन ने यावं लागलं. मात्र खड्डयांबाबत मी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील बोललो. लवकरात लवकर कामं करण्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींशी देखील मी बोलणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसला आता तडफदार नेतृत्व मिळालं आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रा केली नसती तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती, असा टोला लगावतानाच काँग्रेसला आता काम राहिलेलं नाही. टीका टिप्पणी करण्याशिवाय ते काहीच करत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.