Girish Mahajan : खडसेंना 15 वर्ष लाल दिवा आणि 12 खाती मिळाली पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी: गिरीश महाजन

बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse ) जोरदार टीका केलीय.

Girish Mahajan : खडसेंना 15 वर्ष लाल दिवा आणि 12 खाती मिळाली पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी: गिरीश महाजन
Girish Mahajan_Eknath Khadse
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 6:41 AM

जळगाव: महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं (Maharashtra Nagar Panchayat Election) वारंसुरु आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse ) जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली.

एकनाथ खडसेंनी दुकानदारी बंद करावी

गिरीश महाजनं यांनी 15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा टोला देखील महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला.

तुम्ही सव्वाशेर नााही पावशेर झालाय

ज्या वेळेस एकनाथ खडसे समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच. त्यावर गिरिश महाजनांनी खडसेंवर टीकेची संधी साधली. शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.

मी विकासकामांमुळं मोठा झालो

एकनाथ खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मोठं केल. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. लोकांची कामे करावी लागतात. लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं. कमीत कमी 25 हजार च्या लीड ने निवडून दिलं आहे. मी आतापर्यंत कधी पंचवीस हजाराच्या खाली आलो नाही. तुम्ही तर कधी अठराशे रुपये अठराशे मताने कधी आठ हजार मतांनी असे निवडून आले आहेत, असं देखील गिरीश महाजन म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

राज्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकर्‍यांना काय नुकसान भरपाई मिळाली. या महाविकास आघाडीने सरकारने तोंडाला नुसतीच तोंडाला पाने पुसली. मोठ्यांची नावं रेशनकार्डावर आणि गरजू रेशनकार्डपासुन लाभापासून वंचित असे म्हणत महाजनांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडीच्या काळात गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नाही. अन जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार, असे म्हणत म्हाडा असो की आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटीवरुन महाजनांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

बोदवड शहरामध्ये पाणी पिण्यासाठी मिळत नाही महिलांचे हाल होत असतात मात्र हे त्यांना दिसत नाही. राज्य सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही. आता लोकांनी दारू प्यायची का अशा शब्दांतही महाजन यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रावरील ओमिक्रॉनचं संकट वाढतंय, रुग्णसंख्या 54 वर

Natasha Weds Alan : जितेंद्र आव्हाडांची कन्या नताशा आणि एलन यांचे वेडिंग रिसेप्शन गोव्यात संपन्न, शिवसेना नेत्यांनीही लावली उपस्थिती

Girish Mahajan slam Eknath Khadse said he fail work of Development

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.